घरताज्या घडामोडीहर घर तिरंगा मोहीम : भारताचा झेंडा फडकवण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक

हर घर तिरंगा मोहीम : भारताचा झेंडा फडकवण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक

Subscribe

भारत स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्वसी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभराता 'हर घर तिरंगा' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत घराघरांत भारताचा झेंडा लावला जात आहे. देशभरात 13 ऑगस्ट शनिवारपासून या मोहिमेला सुरूवात झाली आहे.

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत घराघरांत भारताचा झेंडा लावला जात आहे. देशभरात 13 ऑगस्ट शनिवारपासून या मोहिमेला सुरूवात झाली आहे. मात्र झेंडा लावला म्हणजे तुम्ही या मोहिमेचा भाग झालात असा, समज बाळगला असेल तर, तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. (Har Ghar Tiranga Tricolour At Home How To Download Har Ghar Tiranga Certificate)

घर किंवा कार्यालयावर तिरंगा फडकवण्याआधी तुम्हाला ‘हर घर तिरंगा’च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. होम पेजवर तुम्हाला PIN A Flag वर क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या समोर एक नवी विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही नाव आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. तुम्ही तुमचा मोबाइल नंबर देत नसाल तर तुम्ही Google Account चा वापर करू शकता.

- Advertisement -

त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला Location Access द्यावे लागणार आहे. लोकेशन अॅक्सेस दिल्यानंतर तुम्ही PIN A Flag In Your Location वर क्लिक करू शकता. त्याचसोबत या ठिकाणी लोकेशनवर Virtual Flag ला जागा देवू शकता. Registration केल्यानंतर तुम्ही सेल्फी अपलोड करू शकता.

असा करा सेल्फी अपलोड

- Advertisement -

‘हर घर तिरंगा’च्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला Upload Selfie चा ऑप्शन दिसेल.
त्यावर क्लिक केल्यानंतर फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला सिस्टम किंवा मोबाइलचे स्टोरेज ओपन होईल.
या ठिकाणी तुम्ही फोटो पाहू शकता.
जो फोटो अपलोड करायचा आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत देशभरात घरोघरी भारताचा झेंडा लावला जात आहे. मुंबईतही महापालिकेवे हर घर तिरंगाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी ध्वजाचे वाटप केले आहे.


हेही वाचा – 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -