घरताज्या घडामोडी'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद पाडला, पिंपरीत संभाजी ब्रिगेड आक्रमक

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला, पिंपरीत संभाजी ब्रिगेड आक्रमक

Subscribe

यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर 'हर हर महादेव' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप संभाजी राजे यांनी केला.

यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड केल्याचा आक्षेप संभाजी राजे यांनी केला. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेड ‘हर हर महादेव’ चित्रपटावर आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. पिपरी चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद केल्याची माहिती समोर येत आहे. (Har Har Mahadev Marathi Movie Show Stop By Sambhaji Brigade in Pimpari)

प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा बहुचर्चित ‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याने संभाजी बिग्रेड आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि मिताली महाजन यांच्या चित्रपटावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या चित्रपटाचा शो बंद पाडला आहे. सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात यांच्या चित्रपटावर मोठा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘हर हर महादेव’ चित्रपटावर आक्षेप घेतला. “हर हर महादेव’ या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास करण्यात आला. हे असे चित्रपट लोकांच्या समोर घेऊन यायचं. छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य घडवून दिलं. मात्र, आपल्याला चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे, म्हणून इतिहासाची मोडतोड करायची का?”, असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -