Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रHarshvardhan Jadhav: हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात; छातीत दुखायला लागले अन् मेयोमध्ये दाखल

Harshvardhan Jadhav: हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात; छातीत दुखायला लागले अन् मेयोमध्ये दाखल

Subscribe

नागपूर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अनेक वॉरंट निघूनही ते न्यायालयात हजर होत नव्हते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. हर्षवर्धन पाटील हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पत्नी संजना जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढली. मात्र पत्नीविरोधात त्यांचा पराभव झाला. गेल्या काही वर्षांपासून हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव हे विभक्त आहेत.

हर्षवर्धन जाधव आज (सोमवार) नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशावरुन त्यांना ताब्यात घेतले. सध्या त्यांना नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तुरुंगात नेण्याचे निर्देश दिले आहे, त्यामुळे पोलिसांकडून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, हर्षवर्धन जाधव यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना पुढील 24 तास पोलिसांकडून अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

नागपुरात 353 अतंर्गत गुन्हा दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 मध्ये नागपूर दौऱ्यावर आले असता, एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात होते. त्यावेळी सुरक्षेमुळे पोलिसांनी त्यांना नकार दिला. त्यानंतर पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाला होता. या घटनेत त्यांच्यावर 353 अंतर्गत सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्यात आज त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदे करणार फडणवीसांसोबत चर्चा