मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नागरिकांना आश्वासन दिलं आहे यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मध्य प्रदेशात भाजप सरकार आल्यास मोफत रामलल्लाचं दर्शन देऊ, असं आश्वासन भाजप देत आहे. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य घृणास्पद, धक्कादायक असल्याचं म्हणत राऊतांनी शहांना माफी मागण्यास सांगितलं आहे. (Has there been a law that if he votes for BJP he will visit Ramallah Sanjay Raut s criticism of amit Shah s statement)
संजय राऊत म्हणाले, अमित शहा मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आल्यास नागरिकांना मोफत रामलल्लाचं दर्शन करण्यास नेण्याचं आश्वासन देत आहेत. हे मोफत, ते मोफत असं भाजपाचं सुरू होतं. आता रामलल्लांचा वापर करत आहेत. याचा अर्थ मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपला पराभूत केलं, तर रामलल्लांच्या दर्शनाला गेलेल्या मध्य प्रदेशच्या नागरिकांना अडवणार का?
भाजपचा रामल्लावरही टॅक्स
निवडणूक प्रचारत भाजप नेत्यांकडून अशी वक्तव्ये होत आहेत. भाजप रामलल्लांची मालक झाली आहे का? की रामलल्लांनी भाजपाला नियुक्त केलं आहे? हा फार गंभीर मुद्दा आहे. निवडणूक आयोग खरंच जीवंत असेल तर त्यांनी या मुद्यावर भाजपावर कारवाई करायला हवी, असं आव्हान संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं.
राऊत म्हणाले की, भाजपाला मतदान दिलं तर रामलल्लांचं दर्शन मोफत, नाहीतर पैसे द्यावे लागतील, दर्शन देणार नाही, असं राजकार देशात सुरू आहे. रामलल्लांवरही मोदी सरकारने कर लावला. औरंगजेबाच्या काळात धार्मिक गोष्टींवर जिझिया कर लावल जायचा. आता भाजपाने रामलल्लांवर कर लावल. यासाठी भाजपाने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
(हेही वाचा: …म्हणजे ते बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसत होते, कदम-कीर्तिकर वादावर अनिल परबांची प्रतिक्रिया )