घरताज्या घडामोडीमला भाजपमध्ये येण्याची ऑफर, मुश्रीफांच्या दाव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात ड्रामा बंद...

मला भाजपमध्ये येण्याची ऑफर, मुश्रीफांच्या दाव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात ड्रामा बंद…

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. मात्र त्यांच्याच जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला आहे.

चंद्रकांतदादांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मी त्यांना नकार दिल्यामुळे माझ्याविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. हसन मुश्रीफ यांनी केलेल्या दावाव्यावर चंद्रकांत पाटीलयांनी पलटवार केला आहे. भाजपने कोणतीही ऑफर मुश्रीफ यांना दिली नव्हती असे सांगून चंद्रकांत पाटील दावा खोडून काढला आहे. हसन मुश्रीफ यांनी सगळा ड्रामा बंद करावा असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये भाजप शून्यावर आले आहे. जनाधार कमी झाल्यामुळे राष्ट्रवादीवर आणि माझ्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात येत आहेत. असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. हसन मुश्रीफ यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती असा दवा केला आहे. हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. मात्र त्यांच्याच जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला आहे. हे भुईसपाट हसन मुश्रीफमुळे झाले आहे. यामुळे मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी त्यांनी मी सांगितले होते, पवार एके पवार. म्हणून त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली असल्याचे राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मैत्रीमुळे चंद्रकांत पाटलांची बदली रद्द

भाजप आज कोल्हापूर जिल्ह्यात ते शून्य आहेत. जिल्हापरिषद, नगरपालिकात, जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात नाही. मार्केट कमिटी ताब्यात नाही. यामुळे सातत्याने दिल्लीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करणार होते. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मैत्रीमुळे ते वाचले आहेत. कोल्हापूरमध्ये होणारा सुपडा साफ हा त्यांचे अपयशाचे कारण आहे. यामुळे हसन मुश्रीफवर आरोप करण्यात येत आहेत असे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांचा पलटवार

राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांनी केलेल्या दावाव्यार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भमिका मांडली असून दावा खोडून काढला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, भाजपमध्ये मेरीटवर एखाद्याला नाकारले जाते. तसेच भाजपमध्ये कोणालाही विनाकारण त्रास देण्याचे कल्चर नाही, त्यामुळे मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली नव्हती असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कोणालाही ऑफर लेटर देत नाही

राष्ट्रवादी नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्यला चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु मुश्रीफ यांना कोणतीही ऑफर देण्यात आली नव्हती असा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “कोणी ऑफर दिली मुश्रीफ साहेबांना? कुठेही ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. आमचे ऑफर लेटर असेच मैदानात पडलेले नाहीत कोणालाही द्यायला” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : पवारांनी पाठीशी न घातल्यानेच मुश्रीफांची तब्येत बिघडली – चंद्रकांत पाटील


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -