घरताज्या घडामोडी१५०० कोटींचा घोटाळा हा सोमय्यांचा जावईशोध, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर

१५०० कोटींचा घोटाळा हा सोमय्यांचा जावईशोध, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर

Subscribe

मुश्रीफांकडून सोमय्यांवर १०० कोटी अब्रुनुकसानीचा दावा दाखल

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी तिसरा घोटाळा उघड केला असून सोमय्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा असून हा घोटाळा जावईशोध असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. माझ्या जावयाचा कोणत्याही घोटाळ्याशी काहीही संबंध नाही असेही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. सोमय्यांनी परिवारावर वारंवार आरोप करु नये असा इशारा देखील हसन मुश्रीफ यांना दिला आहे. माजी खासदार किरीट सोमय्यांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देताना आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी सोमय्यांविरोधात दावा दाखल केला असल्याचे सांगितले आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, दुसऱ्या घोटाळ्याचा उल्लेख दिसला नाही. कोल्हापूर सत्र न्यायालयात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. त्याशिवाय त्यांनी अशी वक्तव्य करु नये यासाठी बंदी आणण्यासाठी याचिका दाखल केली होती. आज त्याची सुनावणी न्यायालयाने ठेवली होती. परंतु त्यांनी नोटीस घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे आज सुनावणी होऊन एकतर्फी निकालाची शक्यता आहे. आता दुसरा घोटाळा असे त्यांनी जाहीर केलंय, मी यापुर्वीच सांगितले होते की, १० ते १२ वर्षांपासून काही कारखाने बंद पडले आहेत. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातले काहीतरी काढा म्हणून एक जावई शोध लावून घोटाळा काढला आहे. सोमय्यांना मी सूचना करेल की, जावयाचे नाव आणि कुटुंबाचे नाव ते घेत आहेत. काही कारण नसताना नाव बदनाम करण्याचे कारस्थान करत आहेत. हे बरोबर नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात मेहनत करुन नाव करत असतो आणि कोणीतरी येऊन चिखलफेक करावी हे काही चालणार नाही असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.

- Advertisement -

आरोपांवर प्रतिक्रिया

ग्रामविकास विभागात राज्यभरातून अनेक मुख्य कार्यकारी अधिकार यांनी पत्र पाठवले होते. की, अनेक ग्रामपंचायतींमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे कंत्राटदार जीएसटी घेतात परंतु ते जीएसटी घेत नाहीत आणि टीडीएस कापत नाहीत यामुळे फार मोठा दंड जिल्हा परिषद पंचायत समितीला होतो. यामुळे ग्रामव्यवस्थेमध्ये काहीतरी युनिफॉर्म व्यवस्था असावी ग्रामपंचायत जिल्हापरिषदेमध्ये जे लेखापरिषक काम करतात त्यांचे काय पैसे द्यायचे याच्याबद्दल एक मार्गदर्शन असावे किंवा सुसूत्रता असावी यासाठी या प्रस्तावा मंजूरी दिली. जानेवारीमध्ये त्याची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये आपण सांगितले होते की, हे ऐच्छिक असेल निविदेमध्ये जर कमीदराने काम करायला कोण तयार असेल तर कमी दराने करा, सुसत्रता यावी म्हणून निविदा मागून दर निश्चित केले परंतु हे कायम केले नाही असे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

त्या त्या स्तरावर आपल्या स्वनिधीमधून किंवा कुठल्याही निधीतून देतील. राज्य सरकारने कोणतीच भूमिका घेतली नाही. भ्रष्टाचारच करायचा असता तर राज्य सरकारने पैसे घेतले असते आणि ते दिले असते. म्हणजे आपण मार्गदर्शक पद्धतीचे काम होते. मार्च २०२१ ला कंपनीला ऑर्डर दिल्यानंतर या कंपनीला एकही पैसा अदा केला नाही. तर सोमय्यांनी कोणता शोध लावला? सोमय्यांचा आरोप हा बिन बुडाचा असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : हसन मुश्रीफांचा तिसरा घोटाळा, जावयासोबत १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -