Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ग्रामसभांना राज्य सरकारची संमती - हसन मुश्रीफ

ग्रामसभांना राज्य सरकारची संमती – हसन मुश्रीफ

राज्य सरकाराने ग्रामसभांना परवानगी दिल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे

Related Story

- Advertisement -

अंतर, नियम आणि कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा संमती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करावे लागणार

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. पण, दरम्यानच्या काळात कोरोना विषाणुचा नवा स्ट्रेन (प्रकार) आढळल्याने दक्षता म्हणून ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. तथापि, ग्रामसभेच्या मंजुरी अभावी वार्षिक विकास आराखडे, सरकारच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरुद्धातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे इत्यादी बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत. हे विचारात घेऊन कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा – मद्यपी बापाने रागात मुलाच्या मांडीचा घेतला चावा


 

- Advertisement -