घरताज्या घडामोडीस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल, हसन मुश्रीफांची माहिती

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल, हसन मुश्रीफांची माहिती

Subscribe

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी ( Amrit Mahotsav) वर्षानिमित्ताने केंद्र (Central )आणि राज्य (State)  शासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमांचे मुल्यांकन व संनियंत्रण केंद्र शासनाच्यावतीने केले जाते. यात महाराष्ट्राने (Maharashtra) देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी बुधवारी दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येकाच्या मनाचा उत्सव आहे. त्यामुळे त्याचा महोत्सव पुढेही सुरू ठेऊन महाराष्ट्राचे प्रथम क्रमांकाचे स्थान पुढेही टिकून राहिल, असा विश्वास व्यक्त करून मुश्रीफ यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Hasan Mushrif: हसन मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार

ग्राम विकास व पंचायतराज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध पातळीवर उपक्रम घेण्यासंदर्भातील नियोजन केले होते. त्यामध्ये ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या उमेद अभियान, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, पंचायत विस्तार (अनुसुचित क्षेत्र) कायदा (पेसा), ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, प्रशिक्षण संस्था, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा विविध स्तरावरील यंत्रणांव्दारे कार्यक्रमांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी सप्टेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत येणाऱ्या दिनविशेष, सप्ताह, पंधरवडा इ. मध्ये करण्यात येत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास‍ व पंचायतराज विभागाने भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या https://indiaat75.nic.in या संकेतस्थळावर २ लाख ४९ हजार १२३ कार्यक्रमांचे आयोजन करून देशात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुध्दा राज्याच्या ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरात ४१ हजार ४४० कार्यक्रमांसह दुसऱ्या तर २८ हजार ९०३ कार्यक्रमांसह झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंची २८ मे रोजी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, काय भूमिका घेणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -