घरमहाराष्ट्रघोटाळ्याशी माझा काही संबंध नाही, कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जातोय - हसन मुश्रीफ

घोटाळ्याशी माझा काही संबंध नाही, कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जातोय – हसन मुश्रीफ

Subscribe

संबंधित कारखान्याशी माझा कुठलाही सूतराम संबंध नाही. चार वर्षांपूर्वी आयकराचे छापे पडले होते यावेळी कारखान्याच्या आणि आमच्या सर्व संबंधित तपासण्या झाल्या होत्या. कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही, समन्स नाही, ईडीची नोटीस नाही. माझ्या जावयावरील आरोप खोटे आहेत. परंतु त्यांच्याशी व्यायसायिक संबंध नाहीत. काही कारवाई करायची असेल तर समन्स पाठवा, बोलवा, मुलाबाळांना नाहक त्रास देणं चुकीचं आहे, म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

घोटाळ्याबाबत खुलासा केल्यानंतरही सोमय्या नव्याने तेच आरोप करतायत

किरीट सोमय्यांनी दीड वर्षांपूर्वी काही आरोप केले होते, त्यांनी काही तक्रारी आणि पत्रकार परिषदा घेऊन सुद्धा आरोप माझ्यावर केले होते. त्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तर मी तीन पत्रकार परिषदा घेऊन दिली होती. आत्ता खुलासा केल्यानंतरही नव्याने तेच आरोप माझ्यावर केलेत, असा दावाही मुश्रीफांनी केला आहे.

- Advertisement -

मी ‘त्या’ कारखान्याचा संचालक नाही

यापूर्वी किरीट सोमय्यांवर फौजदारी, बदनामीचा दीड कोटींचा दावा असे दोन दावे, एक दावा एक कोटींचा आणि एक पन्नास लाखांचा असे दोन दावे कोल्हापूरच्या फौजदारी कोर्टामध्ये केले ते न्यायप्रविष्ठ आहेत. त्यांचा आरोप काय तर, मंत्री पदाच्या कार्यकाळात मिळवलेला माझा काळा पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवला, पण मी त्या कारखान्याचा संचालक नाही, असही स्पष्ट शब्दात मुश्रीफांनी सांगितलं आहे.

माहिती घेतल्यानंतर मला समजलं, आरओसीने (रजिस्टर ऑफ कंपनीस) या शेल कंपन्यांविरोधात खटला दाखल केला होता. त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे प्रकरण देखील न्यायप्रविष्ठ आहे. शेतकऱ्यांचे पैसे घेऊन आजपर्यंत सर्व कारखान्यांची उभारणी झाली आहे. आता थोडा कायद्यात बदल झाला आहे. पण ते सर्व साखर कारखान्याचे पैसे असून त्या माध्यमातूनचं हा कारखाना उभारला गेला आहे, असही मुश्रीफ यांनी सांगितले.

- Advertisement -

ब्रिक्स कंपनीशी माझा काहीही संबंध नाही

चंद्रकात गायकवाड हे पुण्याचे माझे मित्र, मात्र तो माझ्या कुठल्याही व्यावसायिक, धंद्याचे भागीदार नाही. सत्ता त्यांची आहे त्यांनी शोधावं. ब्रिक्स कंपनीशी माझा काहीही संबंध नाही, सगळ्या यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. अप्पासाहेब नलावडे हा कारखाना कोणत्याही बँकेने लिलावात कमी किंमतीत घेतलेला नाही. शासनाने भाडेत्वापोटी ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला होता, पण ही कंपनी दोन वर्षे आदीचं ही कंपनी कारखाना सोडून गेली. आत्ता ही कंपनी तो कारखाना चालवतं नाही. तिथे संचालक मंडळ निवडून आलेले आहे. जायवयाचा आणि त्या कंपनीचा काही संबंध नाही, म्हणत मुश्रीफांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

कुटुंबियांना नाहक त्रास दिला जातोय

कुटुंबियांना नाहक त्रास दिला जातोय. मुलीच्या घरी गेले तिथे मुलीची सासू होती, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत. घरात सुना, लहान नातवंड आहेत, पण भयभीत वातावरण केलं जात आहे, असा आरोप करत ते म्हणाले की, राजकारणासाठी अस केले जात आहे. ग्रामविकासाच्या कामाचं टेंडर त्यावेळेस रद्द केले. काही त्रूटी होत्या म्हणून केले. विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केले जात आहे का? अशी शंका येतेय, असाही मुश्रीफ म्हणाले.

माझा जावई आणि त्या कंपनीची कुठेही संबंध नाही. मंत्री असताना एक जीएसटी टेंडर काढण्यात आले होते. ते टेंडर दोन महिन्यात रद्द करण्यात आले होते. त्यामुळे टेंडरचा विषय येत नाही. यामुळे किरीट सोमय्या जी तक्रार करत आहेत त्याला कुठलाही आधार नाही. बेनामी संपत्तीबाबत न्यायालयातून मला दिलासा मिळला आहे. सत्ता येऊन सहा महिने झाले आहेत तरी हे कशासाठी केले काही कळत नाही. आयकर विभागाने याबाबत मला कुणीही बोलावले नाही, माझ्या मुलाला बोलावलं होतं त्यांना नोटिस आली होती असाही खुलासा मुश्रीफांनी केला आहे.


केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून नामोहरम करण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांचं टीकास्त्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -