घरमहाराष्ट्रईडीच्या कारवाईनंतर भाजपामध्ये एन्ट्री? चंद्रकांत पाटलांच्या ऑफरला मुश्रीफांचे उत्तर

ईडीच्या कारवाईनंतर भाजपामध्ये एन्ट्री? चंद्रकांत पाटलांच्या ऑफरला मुश्रीफांचे उत्तर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली. मुश्रीफांच्या कोल्हापूरातील कागल आणि पुण्यातील निवासस्थानासह त्यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत. माजी नगराध्यक्ष आणि मुश्रीफांचे उजवे हात मानले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरावरही ईडीने छापे मारले. ईडीच्या या कारवाईमुळे आता कोल्हापूरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईनंतर आता हसन मुश्रीफ भाजपमध्ये जाणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ईडीच्या कारवाईनंतर आज हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत दिलेल्या ऑफरवरून प्रश्न विचारण्यात आला. यावर हसन मुश्रीफ यांनी हसत हसत उत्तर देणं टाळलं. मात्र तोच प्रश्न पुन्हा त्यांनी विचारला. तेव्हा मुश्रीफ यांनी असे कसे होईल, असे म्हणत प्रश्नावर अधिक बोलणं टाळलं. मात्र चंद्रकांत पाटलांच्या ऑफरवर मुश्रीफांनी कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडणं टाळल. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर मुश्रीफ म्हणाले की, संबंधित घोटाळ्यांच्या आरोपावर खुलासा केल्यानंतरही किरीट सोमय्यांनी नव्याने माझ्यावर तेच आरोप केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात दीड कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. अशी माहिती मुश्रीफांनी दिली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या, त्यातूनचं ही कारवाई केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.


घोटाळ्याशी माझा काही संबंध नाही, कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जातोय – हसन मुश्रीफ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -