सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात अडचणी आणू नका, मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कोल्हापूर जिल्हा शांतताप्रिय आहे. याची शांतता बिघडू नये आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये.

Kirit somaiya vs hasan mushrif somaiya had new scam information in thackeray government
Kirit Somaiya : आणखी एका घोटाळ्याची माझ्याकडे माहिती, किरीट सोमय्यांचा दावा

माजी खासदार किरीट सोमय्यांचा सोमवारचा कोल्हापूरी दौरा चांगलाच गाजला होता. सोमय्यांना कोल्हापूरमध्ये येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध घालण्यात आले होते. यामुळे सोमय्यांना कोल्हापूरात न येण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवली होती. सोमय्यांना आता कोल्हापूरात येण्यापासून अडचणी आणू नका असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माझ्यावर २ कारखान्यांत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. एकंदरीत या कोल्हापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने येण्यास प्रतिबंध केला होता. मंगळवार पुन्हा ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की, कोणीही अडथळा करु नये आणि कोणत्याही परिस्थितीची अशी घटना घडू नये की ज्यामुळे आपला पक्ष बदनाम होईल असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, माजी खासदार किरीट सोमय्यांना माझी सूचना आहे. कोल्हापूर जिल्हा शांतताप्रिय आहे. याची शांतता बिघडू नये आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अशा प्रकारचे विधाने करावी अनेकवेळा त्यांनी वक्तव्य केलं आहे. पुन्हा त्यांनी पुर्वीसारखे वक्तव्य केलं तर शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे त्यांनीही दौरा शांततेत करावा. सूचना केली होती की, कोल्हापूरमधील राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील माझ्या कामाबाबत माहिती घ्यावी अशी विनंती आहे.

मुश्रीफ यांची पहिल्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया

शाहू आणि हमीदवाडा कारखान्याच्या स्थापनेतही योगदान असताना राजकीय परिस्थितीमुळे बाजूला व्हावे लागले. मग शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि आम्हाला मानणाऱ्या स्वतःचा हक्काचा कारखाना व्हावा अशी अपेक्षा होती. त्याच काळात महाराष्ट्र सरकारने सहकारी साखर कारखानदारी नोंदणी, भागभांडवल देण्याचा निर्णय बंद केल्यामुळे पब्लिक कॅपिटल कारखाना स्थापन केला. सोमय्यांचा आरोप आहे की, ९४ कोटी शेअर कॅपिटल आणला आहे. तो मुश्रीफांनी मंत्री झाल्यानंतर आणला असावा असा त्यांचा समज असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

यामध्ये एकही पैसा अशाप्रकारचा पैसा नाही जी सोमय्यांची अपेक्षा आहे. केंद्रीय तपास यंत्रणेची रेड झाली त्यामध्ये आम्ही सगळी माहिती दिली आहे. पुन्हा ते जिथे जातील तिथे आम्ही माहिती देऊ. त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की यामध्ये तुम्हाला वाटतं तसे काही नाही. १० वर्षांपुर्वी उभारलेला हा कारखाना अतिशय उत्कृष्टपणे चालवला आहे. वेळेवर कामगारांचे पगार देणे, एफआरपी देणे, बोनस देणे, पाच किलो साखर महिन्याला देण्याचे काम हा साखर कारखाना करत आहे.

दुसऱ्या घोटाळ्यावर प्रतिक्रिया

आप्पासाहेब नलावडे कारखाना गडहिंग्लज हा कारखाना २०१२-१३ मध्ये बंद पडण्याच्या अवस्थेत होता. त्यावेळी संचालक मंडळाने विनंती केली. या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारुन ब्रीक्स इंडिया ह्या कंपनीला हा कारखाना चालवण्यास सांगितला. महाराष्ट्र सरकारच्या सहयुक्त तत्वावर १० वर्षे ४३ कोटी रुपये भाड्यावर आणि ४३ कोटी अगाऊ म्हणून १० वर्षांसाठी कारखाना चालवण्यास घेतला. ८ वर्षांत अनेक अडचणी आल्या परंतु कारखान्याच्या मशीन जुन्या असल्यामुळे ८ महिन्यांच्या कालावधीत ८० कोटीचा तोटा आणि २ महिन्यांच्या पुर्वीच सगळ नुकसान सोसून संचालक मंडळाच्या ताब्यात कारखाना देऊन कंपनी केली.