Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी घटनादुरुस्तीचा विषय केंद्राचा मग संभाजीराजेंना चर्चेला बोलवणं ट्रॅप कसा? हसन मुश्रीफ यांचा...

घटनादुरुस्तीचा विषय केंद्राचा मग संभाजीराजेंना चर्चेला बोलवणं ट्रॅप कसा? हसन मुश्रीफ यांचा सवाल

वंचित बहूजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः सांगत आहेत की, केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही.

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गुरुवारी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांसमोर काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या मार्गी लावण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. परंतु घटनादुरुस्तीशिवाय मराठा आरक्षण मिळणार नाही यामुळे संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची भेट ट्रॅप असल्याची टीका केली केली जात आहे. यावर घटनादुरुस्तीचा विषय केंद्र सरकारकडे असताना संभाजीराजेंना चर्चेला बोलवणं आणि त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यात आला तर मग ही भेट ट्रॅप कशी असू शकते? असा सवाल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आणि टीकेवर सडेतोड उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन केल्यानंतर मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना चर्चेला बोलावलं होतं. यावेळी संभाजीराजेंनी ६ ते ७ मागण्या केल्या असून या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतू वंचित बहूजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः सांगत आहेत की, केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. तर मग राजेंना चर्चेला बोलावणं ट्रॅप कसं असू शकतो? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

निवडणूकांबद्दल वरिष्ट निर्णय घेतील

- Advertisement -

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. यावर मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी म्हटलं आहे की, निवडणूकांना अजून बराच कालावधी बाकी आहे. त्यामुळे आता चर्चा करुन अर्थ नाही. याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसचे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

वाझे प्रकरणात मुख्य सूत्रधार वेगळा

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोणी वेगळाच आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा असे सांगताना सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे धाडस करु शकतात का? असा प्रश्न करत या प्रकरणाचा सूत्रधार वेगळाच असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

- Advertisement -