घरताज्या घडामोडीहेट स्पिच प्रकरण : निलंबित भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून FIR दाखल

हेट स्पिच प्रकरण : निलंबित भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून FIR दाखल

Subscribe

मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रक्षोभक भाषणं करण्यात येत आहेत. सकल हिंदू समाजाचा मुंबईत मोर्चा निघाला होता. त्यावेळीही त्या मोर्च्यामध्ये प्रक्षोभक भाषणं करण्यात आली. घोषणाही करण्यात आल्या. मात्र, यावर राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची करवाई केली नव्हती. दरम्यान, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच मुंबई पोलिसांकडून FIR दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत २९ जानेवारी रोजी एका जाहीर सभेत त्यांनी द्वेषपूर्ण भाषण केलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांच्याविरोधात FIR नोंदवला आहे. आयपीसी कलम १५३ ए १(अ) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

तेलंगणातील भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांनी मुंबईतील हिंदू सकल समाज मोर्चात कथित द्वेषपूर्ण भाषण दिल्यानंतर दादर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणार्‍या आणि धार्मिक सलोख्याला बाधा आणणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकार नपुसंक, SCचे निरिक्षण

भडकाऊ भाषणं रोखण्याची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिंमत नाही. हे सरकार नपुंसक आहे, असे खडेबोल सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. हिंसक प्रकार होत असताना सरकार शांत का आहे? सरकराने असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावले का नाही उचलली, असा सवाल करत याचे प्रत्त्यूतर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.


हेही वाचा : महाराष्ट्र सरकार नपुसंक, SC चे निरिक्षण फडणवीसांनी फेटाळले; विरोधकांना म्हणाले…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -