पुण्यावर प्रेम करणारा अजित पवार यांच्यासारखा नेता आमच्यासोबत असल्यामुळं विकासाला आणखी गती मिळेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे शहरातील चांदणी चौकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी झाला. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराचा विकासाचा आराखडा मांडला. तसेच पुणे मेट्रोच्या आधी नागपूर मेट्रो का झाली? कोणत्या कारणामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प रखडला, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Having a leader like Ajit Dada with us will speed up the development of Pune says dcm Devendra Fadnavis)
चांदणी चौकातील (Chandani Chawk Flyover) नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. वाहतूक कोंडीत अडकून लोकांना दिवसा चांदण्या दिसायच्या म्हणून या चौकाला चांदणी चौक हे नाव पडले असे मला वाटत होते. पण अजित पवारांनी माझ्या ज्ञानात भर घातली. अजितदादांनी या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडलं ते सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, गडकरी साहेबांचे पुण्यावर, राज्यावर असलेल्या प्रेमामुळं वेगवेगळे प्रकल्प होत आहेत, याचा आनंद असल्यचा फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढ्या वेळा पुण्यात आले तेवढ्या वेळेस दुसरे कोणतेही पंतप्रधान पुण्यात कधी आले नाहीत. ते आणखीही पुण्यात येतील असे फडणवीस म्हणाले.
पुण्याच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी साहेब आणि राज्य सरकार करेल असे फडणवीस यावेळी म्हणाले. नितीन गडकरी यांच्यासारखे दृष्टे नेते आपल्याकडे आहेत. गेल्या नऊ वर्षामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं आहे. पायाभूत सुविधा वाढत असल्याचे फडणवीस म्हणाले. अलिकडे मी एक सर्वे वाचला. यामध्ये दहा किलोमीटर जाण्यासाठी 30 मिनीटांचा वेळ लागतो. त्यामुळं जो देशातील पहिल्या सहा ट्रॅफिक जाम असलेल्या शहरात पुण्याचा नंबर लागतो. त्यामुळं पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करणं गरजेचं असल्याचे फडणवीस म्हणाले. वाहतूक कोंडी संपवण्यासाठी उड्डाणपूल करणे गरजेचे आहे. आता आपण ज्या वेगानं काम करतोय, त्यामुळं वाहतूक कोंडी फोडणे शक्य होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
‘पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असल्यामुळे निर्णय घेताना अडथळे निर्माण होतात. कोणी अमेरिकेचा रिपोर्ट आणतं, तर कोणी स्वितर्झलँडचा रिपोर्ड आणतं, कोणी जर्मनीचं आणतं. पण या तिन ठिकाणांपैकी प्रमाण रिपोर्ट कुठला? कारण प्रमाण भाषा पुण्याची मग प्रमाण रिपोर्ट कोणता? याचा निर्णय करताना वेळ निघून जातो’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – PUNE CHANDANI CHOWK : एकीकडे फेसबूक पोस्ट तर दुसरीकडे कार्यक्रमाला हजेरी, मेधा कुलकर्णी चर्चेत