घरक्राइमलग्नापूर्वी खोट्या आमिषांद्वारे शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हाच, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नापूर्वी खोट्या आमिषांद्वारे शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हाच, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Subscribe

होणाऱ्या नवऱ्याने आमिष दाखवून एका तरुणीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते, परंतु नंतर तो मागे हटला. यानंतर महिलेने तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी होणाऱ्या नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भंडारा जिल्ह्यातील तरुणाने लग्न करण्याचे आमिष दाखवून जंगल रिसॉर्टमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुलीनं केली होती.

मुंबईः खोट्या तथ्यांच्या आधारे जर एखाद्या महिलेबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यास त्यासाठी महिलेची संमती असल्याचं मानण्यात येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं याचिका फेटाळत हा आदेश दिलाय. एका तरुणाने आपल्यावरील बलात्काराचा एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. होणाऱ्या नवऱ्याने आमिष दाखवून एका तरुणीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते, परंतु नंतर तो मागे हटला. यानंतर महिलेने तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी होणाऱ्या नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भंडारा जिल्ह्यातील तरुणाने लग्न करण्याचे आमिष दाखवून जंगल रिसॉर्टमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुलीनं केली होती.

लग्नाच्या वचनाच्या आधारावर संमती मानली जाऊ शकत नाही

या प्रकरणावर भाष्य करताना विभागीय खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती गोविंद सानप म्हणाले की, तरुणाचा हेतू अत्यंत चुकीचा होता हे एफआयआरवरून स्पष्ट होते. पीडितेच्या इच्छेविरुद्ध लग्नाचे आश्वासन देऊन त्याने पीडितेकडून शरीर संबंधांसाठी संमती मिळवली. तरुणीकडून मिळालेली संमती ही तिच्या इच्छेनं मानली जाऊ शकत नाही, कारण ही संमती तरुणाने तिच्यासमोर खोटी तथ्ये मांडल्यामुळे मिळाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तरुणाच्या या कृत्याला फसवणुकीची साधी केस मानता येणार नसून हा बलात्काराचा गंभीर गुन्हा असल्याचे म्हटलेय. या कृत्यामागे तरुणांचा चुकीचा हेतू आधीच दडलेला असल्याचे खंडपीठाने म्हटलेय. आपली लैंगिक इच्छा पूर्ण झाली की तो लग्नास नकार देईल, असे तरुणाला आधीच वाटले होते. त्यामुळे सेक्स करताना आरोपीचा हेतू संपूर्णपणे पाहणे आवश्यक आहे. या खटल्यातील सर्व पक्षकारांना विचारात घेऊन हा खटला रद्द होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवले

फेब्रुवारी 2021 मध्येही तरुणी आणि तरुणामध्ये संपर्क झाला होता. एप्रिलमध्ये दोघांचे लग्न गडचिरोलीत निश्चित झाले होते. कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच लग्न पुढे ढकलण्यात आले. यानंतर मुलीला स्वतः कोरोनाची लागण झाली. जून महिन्यात करहांडला रिसॉर्टमध्ये तरुणांनी पार्टी आयोजित केली होती. यादरम्यान तरुणीला पुन्हा लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सकाळी त्याने पुन्हा तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तरुणाने तिला दूर केले. त्यानंतर तरुणीने तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -