घरक्राइमकेतकी चितळेविरोधातील सर्व एफआयआर कळवा पोलीस ठाण्यात वर्ग, हायकोर्टाचे आदेश

केतकी चितळेविरोधातील सर्व एफआयआर कळवा पोलीस ठाण्यात वर्ग, हायकोर्टाचे आदेश

Subscribe

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणातील केतकीविरोधात राज्यभरात दाखल झालेले सर्व एफआयआर ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तर निखील भामरेच्या विरोधातील एफआयआर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. चितळेविरोधा एकूण 22 एफआयआर तर विद्यार्थी निखिल भामरे याच्याविरोधातील सर्व 6 एफआयआर नोंदवण्यात आले होते.

केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील कविता सोशल मिडियावर फॉरवर्ड करून सामजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. दोन समुदाया तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपाखाली विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले होते. तर बारामतीच्या गांधीसाठी बारामतीचा नथुराम गोडसे निर्माण करण्याची वेळ आली आहे, अशा आशयाचे वक्तव्य करून निखिलने सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला. दोन समुदायांत तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपाखाली त्याच्याहीविरोधात विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या

- Advertisement -

नुकसान भरपाई देण्याची मागणी –

एफआयआर रद्द करण्याची आणि बेकायदेशीर अटक केल्याबद्दल पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई देण्याचा आदेश द्यावा, अशी याचिका केतकी आणि निखिलने उच्च न्यायालयात दाखल केली होती. यात आता सर्व एफआयआर जिथे पहिली एफआयआर नोंदवली गेली त्या पोलीस ठाण्यात ते वर्ग करायला हवे असे सांगितले. दरम्यान यात दोघांच्या वकिलांनी अमिश देवगण व नुपूर शर्मा प्रकरणाची आठवण करून दिली. यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने केतकीचे सर्व एफआयआर कळवा पोलीस ठाण्यात आणि निखिल भामरेचे एफआयआर नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश दिले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -