घरमहाराष्ट्रसाताऱ्यात खळबळ! तो गेला, त्याचं श्राद्धही घातलं; अन् एकेदिवशी तो पुन्हा परतला

साताऱ्यात खळबळ! तो गेला, त्याचं श्राद्धही घातलं; अन् एकेदिवशी तो पुन्हा परतला

Subscribe

नवऱ्याने ८ वर्षांपूर्वी घर सोडले, तीन वर्षांची मुलगी, एक वर्षाचा मुलगा आणि पत्नीने नवरा आज येईल, उद्या येईल म्हणून वाटेकडे डोळे लावले होते. मात्र...

हिंदू धर्मात एखादा माणून देवाघरी केला की त्याचे विधी केले जातात. जसे की दहावं, बारावं वर्षानंतर श्राद्ध घालण्याची परंपरा आपल्याकडे असते. मात्र साताऱ्यात असा प्रकार घडला ज्याने एकच खळबळ उडाली. साताऱ्यातील एका घरातून निघून गेलेला नवरा अचानक ८ वर्षांनी परतला असून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. जी व्यक्ती मरण पावली असे समजून नातेवाईकांसमक्ष श्राद्ध घातले, विधीही उरकले आणि ती व्यक्ती अचानक परतल्याने कुटुंबीय चकीत झाले.

असा घडला प्रकार

नवऱ्याने ८ वर्षांपूर्वी घर सोडले, तीन वर्षांची मुलगी, एक वर्षाचा मुलगा आणि पत्नीने नवरा आज येईल, उद्या येईल म्हणून वाटेकडे डोळे लावले होते. मात्र, नातेवाईकांच्यापुढे काहीच चालेना म्हणून तिने नवरा परत येण्याची आशाच सोडून दिली. अखेर, काहीतरी बरे-वाईट झाले असेल असे समजून नातेवाईकांच्या मदतीने मढे घाटावर तेराव्याचा विधी पार पडला. त्यानंतर वर्षाने श्राद्धही घातले, अन् काही वर्षात तो पुन्हा घरी परतला.

- Advertisement -

सातारा येथील यशोधन निवारा आश्रम केंद्रात काही दिवसांपूर्वी दलालाच्या तावडीतून सुटका केलेल्या ४ मनोरुग्णांना आणण्यात आले होते. तेथे आश्रमात ते राहत होते. त्यातील एक शांत होता. दोन दिवसांनंतर त्याला माहिती विचारण्यात आली, त्यावेळी त्याने पत्नी व मुलांची नावे सांगितली. तसेच, पालघर जिल्ह्यातील मनोर तालुक्यात कोसबांड हे आपलं गाव असल्याचंही त्याने सांगितलं. त्यामुळे, त्या व्यक्तीला घरी सोडण्याचा निर्णय आश्रमाचे संचालकांनी घेतला.

संचालकांनी ठरल्याप्रमाणे त्या व्यक्तीला घेऊन कोसबांड गाव गाठले. त्यावेळी, गावच्या सरंपचांनी साजनला पाहून धक्काच बसला. अरे.. तुझं तर बायकोनं श्राद्ध घातलं होत की, तू जिवंत कसा.. ? अस प्रश्न सहजच सरपंचांच्या तोंडातून निघाला. मात्र घरातील सर्वांनाच आनंद झाला.


धक्कादायक! पतीने आपल्या पत्नी चिमुरडीची केली हत्या; शरीराचे केले २२ तुकडे आणि…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -