तुरुंगातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराने ब्युटी पार्लरमध्ये महिलेवर केला बलात्कार

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि सध्या पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने नवीन नाशिकमध्ये २७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याने ब्युटी पार्लरमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अंबड पोलीस ठाण्यास भेट दिली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.