घरमहाराष्ट्रहेल्मेट घातले असते, तर 'तो' वाचला असता

हेल्मेट घातले असते, तर ‘तो’ वाचला असता

Subscribe

हेल्मेटसक्ती असताना देखील पुण्यामध्ये सर्रास हेल्मेट न घालता वाहन चालवली जातात आणि त्यामुळे अपघात होतात. अशीच एक घटना आज पुण्यामध्ये घडली आहे. हेल्मेट न घातल्यामुळे एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहे.

वाहतूक नियमांना डावलून आजही अनेक जण हेल्मेट घालणं टाळतात. त्यावरून अनेकांचे वाहतूक पोलिसांशी वाद देखील होतात. तर काही ठिकाणी अनेकदा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू देखील होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशी एक घटना आज पिंपरी – चिंचवडमध्ये घडली आहे. एका तरुणांनं हेल्मेट न घातल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे घडली आहे. अमन पांडे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हेल्मेट घातले असते तर तो वाचला असता, अस पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन पांडे हा आपल्या मैत्रिणाला घेऊन हिंजवडी मधील एका कंपनीत मुलाखतीकरता गेला होता. अमनं तिला दुचाकीवरून कंपनीच्या गेट वर सोडून परत निघाला. अमन हा १४० च्या गतीने दुचाकी चालवत होता. तसेच त्याने हेल्मेट देखील घातलेले नव्हते. विप्रो सर्कलच्या दिशेने येत असताना वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट दुभाजक ओलांडून दुचाकीसह भरधाव वेगात असलेल्या कारवर जाऊन आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात अमनचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

अमन विषयी थोडक्यात...

अमन हा इंद्रायणी कॉलेजला बी.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो मूळचा पटना येथील असून आदिती ही बी.बी.ए.तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान या घटनेमुळे मैत्रीण आदितीला दुःख अनावर झाले असून ती स्वतः ला दोष देत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गभाले हे करत आहेत.


वाचा – फेटे घालून पुणेकरांनी काढली हेल्मेटसक्तीविरोधात रॅली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -