त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला आव्हान

cm eknath shinde orders director general of police to cancel special protocol to chief minister convoy to avoid traffic jam

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबतचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. अनिल देसाई आणि संजय राऊत यांनी शिवसेनेच्या संपर्कात 20 आमदार असल्याचे म्हटले आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तर 15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. त्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे पलटवार केला आहे.

दिपक केसरक भूमीका स्पष्ट करणार –

केसरक हे आमची भूमीका स्पष्ट करतील. केसरक आमचे प्रवक्त आहेत. ते तुम्हाला वेळोवेळी माहिती देत आहेत. आम्ही जी बाळासाहेब आणि शिवसेनेची भूमिका आहे ती पुढे घेऊन जात आहोत. आम्हि शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेनेला पुढे घेऊन जात आहोत. आपल्याला जे पुढचे पाऊल असेल त्याची माहिती दिली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

त्यांनी नावे जाहीर करावीत – 

हे सगळे लोक जे आहेत ते आनंदात आहेत. जी माहिती बाहेरून येत आहेत की आमच्या बरोबर एवढे लोक संपर्कात आहेत तेवढे लोक संपर्कात आहेत, कृपया त्यांनी नावे सांगावीत आणि मग स्पष्टता येईल. या मध्ये खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचे काम हे लोक करत आहेत. त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवण्याची आवश्यक्ता नाही. येथे 50 लोक आहेत. ते 50 लोक स्वताच्या मर्जीने आले आहेत. ते खुश असून आनंदी आहेत. एक भूमिका घेऊन आम्ही आलो आहोत. ते 40 ते 50 लोक स्वत:च्या स्वार्थासाठी आलेले नाहीत. एक हिदूत्वाची भूमीका बाळासाहेबांची भूमीका घेऊन ते आले आहेत. असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले.