Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "राज्यातील राजकारण त्यांनी समजून घेतले पाहिजे", राऊतांचा राष्ट्रवादीच्या नेत्याला टोला

“राज्यातील राजकारण त्यांनी समजून घेतले पाहिजे”, राऊतांचा राष्ट्रवादीच्या नेत्याला टोला

Subscribe

महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे धूसफुस होताना पाहायला मिळत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारचं नाही तर स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या लिखाणाला आणि वक्तव्यांना महत्त्व देत नसल्याचे जाहीर केले आहे

“He should understand politics in the state..”, Sanjay Raut challenge to NCP leader PPK. “संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे मविआमध्ये वाद सुरु आहेत. सामना हे त्यांचे मुखपत्र आहे कोणते सामान्य वृत्तपत्र नाही, त्यामुळे हे वाद आणखी वाढत आहेत, याला राऊत जबाबदार आहेत,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी एका प्रसार माध्यमाला सांगितले. पण त्यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

हेही वाचा – मणिपूर जळतंय आणि पंतप्रधान, गृहमंत्री कर्नाटकात ठाण मांडून बसलेले, राऊतांचा हल्लाबोल

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील राजकारण सुनिल तटकरे यांनी समजून घेतली पाहिजे. सामना गेल्या 40 वर्षांपासून राज्यातील राजकारणाबाबत लिहित आहे. जेव्हा राष्ट्रवादीसोबत कोणासोबत कोणी नव्हते, त्यावेळी सामनामधूनच त्यांना पाठिंबा देण्यात येत होता. पण आता जर का कोणी याबाबत आपले मत मांडत असेल तर ठीक आहे. जर का त्यांना काही वेगळे आणि चुकीचे वाटतं असेल तर त्यांच्या नेतृत्वाने याबद्दल येऊन चर्चा करावी. आम्ही थांबवलेले नाही. मी माझ्या पक्षाची, देशाची आणि राज्याबद्दल बोलत आहे. यामुळे आपल्या पोटात दुखण्याची गरज नाही. मी माझ्या पक्षाचे मत मांडत आहे, तुम्हीही मांडा. जर तुमचे काही मत असेल, हिंमत दाखवा आणि बोला असे म्हणत राऊतांनी सुनिल तटकरे यांना बोलण्याचे आव्हान केले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला गेले असता, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते सामनातील अग्रलेखाबाबत बोलताना म्हणाले होते की, “सामनातील अग्रलेखाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू दे. आम्ही आमचं काम करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काय करतो, हे त्यांना माहिती नसतं. मात्र, आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक असतं.”

- Advertisement -

संजय राऊतांचे शरद पवारांना प्रत्युत्तर
त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, “चांगली गोष्ट आहे, शरद पवार सामनाला महत्त्व देत नाही म्हणाले. मात्र, मी कुठे म्हणतो सामनाला महत्त्व द्या. शरद पवार आमच्या सर्वांचे नेते आहेत.”

‘सामना’तील अग्रलेखात काय लिहिले होते?
सोमवारी सामना या शिवसेनेच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करण्यात आली होती. “शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला”, असे लिहित राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला होता.

- Advertisment -