आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरेंवर, मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहणार – सुनील राऊत

He will stay with Shiv Sena till his death, said Sunil Raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत यांच्यावरूनही चर्चांना उधाण आले होते. यानंतर सुनील राऊत या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. आपण शिवसेनेसोबत आहोत, असं विधान त्यांनी केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे आमचे कुटुंबीय –

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे आमचे कुटुंबीय आहेत. जे काही राहिले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राज्यात वाढवू. अनेक मोठे नेते ज्यावेळी पक्ष सोडून गेले, त्यावेळी आम्ही शिवसेना मोठ्या संख्येने वाढवली. आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरेंवर आहे. अडीच वर्षापूर्वीचे त्यांचे रिकॉर्ड बघा. माझ्या दोन्ही मतदार संघात मी फंड खर्च करतोय. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना फंड मिळाला आहे. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला फंड मिळाला आहे. हा फंड महाविकास आघाडीमुळेच मिळाला आहे’ असं सुनील राऊत यांनी म्हटले आहे.

मरेपर्यंत शिवसेनेसोबत –

आमदार सुनील राऊत यांच्याकडून शिवसेनेच्या समर्थनात असल्याचे बॅनरही लावण्यात आले आहे. आम्ही शिवसेने सोबत, अशा आशयाचे पोस्टर संजय राऊत यांच्या निवास असेलेल्या परिसरात लावण्यात आलेत. सुनिल राऊत सुद्धा शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र संजय राऊत यांनी अखेर या वृत्ताचे खंडण केले आहे. आपण मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बंडखोर आमदारांनी काय केले होते आरोप –

बंडखोर शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडातील घटक पक्षांमुळे शिवसेनेचे खच्चीकरण  झाले. आमदारांना फंड मिळाला नाही, मुख्यमंत्र्यांची भेटीसाठी वेळ दिला नाही, अशी तक्रार बंडखोर आमदारांनी केली आहे. हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी बंडखोरांनी केली होती.