घरमहाराष्ट्रधक्कादायक! नागपूर विद्यापीठाच्या डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची पतीच्या निधनानंतर आत्म्यहत्या

धक्कादायक! नागपूर विद्यापीठाच्या डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची पतीच्या निधनानंतर आत्म्यहत्या

Subscribe

नागपूरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी पतीच्या निधनानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेश्राम यांनी नागपूरातील बेलतरोडीतील फॉच्युन श्री अपार्टमेंटच्या नव्या मजल्यावरून उडी घेऊन आपले जीवन संपवले. आज पहाटे ४.३० वाजता सुमारास ही घटना घडली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या त्या पत्नी होत्या. दरम्यान पती सुधीर मेश्राम यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर गेली अनेक दिवस त्या तणावाखाली होत्या. त्यातूनचं त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले अशी शक्यता वर्तवली जाते. परंतु. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या आत्महत्येमुळे नागपूर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांचा मुलगा अमेरिकेत राहतो. आठ दिवसांपूर्वीच त्या अमेरिकेहून नागपूरला परतल्या. नागपूरात त्या आपल्या मावशीसोबत बेलतरोडी येथील फॉर्च्युन श्री अपार्टमेंटमच्या नवव्या मजल्यावर राहत होत्या. मात्र आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाला मोठा आवाज आल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मेश्राम रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या नातेवाईकांना माहिती देत बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तरी पतीच्या निधनामुळे त्या गेल्या काही महिन्य़ांपासून नसिक तणावात असल्याचे सांगितलं जात आहे.ज्योत्सना मेश्राम या माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत्या. डॉ. सुधीर मेश्राम यांचं मार्च महिन्यात निधन झाले होते. ज्योत्स्ना मेश्राम या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या.


मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानाप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -