घरCORONA UPDATEमध्य रेल्वेचा 'रक्षक' रोबोट लढणार कोरोनाशी!

मध्य रेल्वेचा ‘रक्षक’ रोबोट लढणार कोरोनाशी!

Subscribe

कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी आरोग्य सहाय्यक रोबोट “रक्षक” पूर्णपणे इनहाऊस बनविला असून, तो भारतरत्न  बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, भायखळा ह्यांना सुपूर्द करण्यात आला.

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी मेडिकल असिस्टंट रोबोट नंतर मध्य रेल्वेने पुन्हा एक नविन रोबोट तयार केला आहे. रक्षक असं या रोबोटचे नाव आहे. या रोबोटची निर्मिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कुर्ला येथील ईएमयू कारशेड मध्ये करण्यात आली आहे. या रक्षक रोबोटला भारतरत्न  बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, भायखळा ह्यांना सुपूर्द करण्यात आले आहे .

असा आहे रक्षक ?

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कुर्ला येथील ईएमयू कार शेड मध्ये कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी आरोग्य सहाय्यक रोबोट “रक्षक” पूर्णपणे इनहाऊस बनविला असून, तो भारतरत्न  बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, भायखळा ह्यांना सुपूर्द करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल यांनी मंगळावरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भायखळा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय संचालिका डॉ. मीरा अरोरा यांच्याकडे हा रोबोट “रक्षक” सुपूर्द केला. वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता सुनील बैरवा आणि त्यांच्या समर्पित टिमने याची रचना इनहाऊस केली आहे.हा वैद्यकीय सहाय्य दूरस्थपणे डॉक्टर आणि रूग्णांमधील संवाद साध्य करण्यासाठी कार्यक्षमपणे तयार केला गेला आहे. हे रोबोट तापमान, नाडी, ऑक्सिजन टक्केवारी सारख्या आरोग्याचे मापदंड मोजू शकते आणि स्वयंचलित सॅनिटायझर, इन्फ्रारेड सेन्सर यांतून बाहेर येते. “रक्षक” रूग्णांना औषध / भोजन पोहोचवू शकतो आणि डॉक्टर आणि रूग्णामध्ये एकमेकाशी व्हिडिओ संवाद होऊ शकते. हे १५० मीटर अंतरापर्यंत  रिमोट ऑपरेशनद्वारे  सम पातळीच्या पृष्ठभागावर सर्व दिशेने जाऊ शकते.

सतत सहा तास करू शकतो काम 

रक्षक रोबोट हा  बॅटरीवर चालणार रोबोट आहे. पूर्ण चार्ज झालेल्या बॅटरीसह, हे सतत 6 तास कार्य करू शकते आणि ट्रेमध्ये 10 किलो पर्यंतच्या  वस्तूची वाहतूक करू शकते.  हे Wi-Fi वर आधारित आहे आणि त्यामुळे मोबाइल डेटाची आवश्यकता  नाही आणि ॲन्ड्रॉइड मोबाइलद्वारा ऑपरेट होते.   रुग्णांचा व्हिडिओ आणि छायाचित्रण (स्नॅप शॉट्स) देखील डाउनलोड करता येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -