घर महाराष्ट्र Health Department : आरोग्य विभागात जवळपास 11 हजार पदांसाठी भरती, आज येणार...

Health Department : आरोग्य विभागात जवळपास 11 हजार पदांसाठी भरती, आज येणार जाहिरात

Subscribe

आरोग्य विभागाकडून लवकरच राज्यातील आरोग्य खात्यातील विविध 11 हजार पदांवर भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली असून याबाबतची जाहिरात आज (ता. 29 ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील आरोग्य विभागाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील कळवा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या शासकीय रुग्णालयात या महिन्यात पाच दिवसांमध्ये तब्बल 20 पेक्षा जास्त निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. ज्यामुळे उशिरा जाग आलेल्या आरोग्य विभागाकडून लवकरच राज्यातील आरोग्य खात्यातील विविध 11 हजार पदांवर भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली असून याबाबतची जाहिरात आज (ता. 29 ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यात नागरिकांनी आपला जीव गमावल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आल्याचे बोलले जात आहे. (Health Department Recruitment for nearly 11 thousand posts)

हेही वाचा – भाडे नाकारल्यानंतर ओला, उबरच्या चालकांना भरावा लागणार दंड, पण प्रवाशांना होणार फायदा, वाचा…

- Advertisement -

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून राज्यांमधील आरोग्य विभागात कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नव्हती. महाविकास आघाडीचे सरकार असताना आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली. परंतु आता ठाण्यात घडलेल्या घटनेमुळे राज्य सरकारने आरोग्य विभागातील 11 हजार पदांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये संचालक पदापासून ते शिपाई पदापर्यंतच्या रिक्त असलेल्या सर्व जागांवर भरती करण्यात येणार आहे. ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10 हजार 949 पदांसाठी आज जाहिरात काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ज्या 10 हजार 949 पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया ही MPSC, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सटल्सी सर्विसेसच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. सध्या राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात 2 संचालक, 4 अतिरिक्त संचालक, 5 सहसंचालक, 23 उपसंचालक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्याशिवाय, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील 121 पदे, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील 338 पदे, तज्ज्ञ डॉक्टरांची 479, अ श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची 983 पडे आणि ब श्रेणीतील अधिकाऱ्यांची 238 पदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आरोग्य विभागातील या पदांचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

- Advertisement -

या महिन्यामध्ये ठाणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल 18 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावलेला होता. यानंतर याप्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली. काही तासांमध्ये पाच नागरिकांनी आपला जीव गमावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मनसेच्या काही नेत्यांनी या रुग्णालयात धाव घेऊन येथील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. परंतु त्यानंतर देखील या रुग्णालयातील कामकाजावर कोणताही परिणाम न झाल्याने या रुग्णालयातील तब्बल 18 जणांना दहा तासांमध्ये आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार, अपुरी डॉक्टरांची क्षमता आणि रुग्णांच्या उपचारांमध्ये होत असलेली हाल या सर्व गोष्टींमुळे नागरिक आपला जीव गमावत असल्याचे समोर आले. परंतु इतकं सर्व काही होऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये हे मृत्यू का झाले? याबाबतची सविस्तर माहिती अद्यापही समोर आलेली नाही. परंतु आता होणाऱ्या भरती प्रक्रियेमधून लवकरच रिक्त जागा भरण्यात याव्या, अशीच आशा व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -