घरताज्या घडामोडीकोरोनावर उपचार, निर्बंध आणि लॉकडाऊनसाठी देशपातळीवर एकसारखे निकष ठेवा, महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी

कोरोनावर उपचार, निर्बंध आणि लॉकडाऊनसाठी देशपातळीवर एकसारखे निकष ठेवा, महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी

Subscribe

केंद्र मंत्र्यांसाठी मी दोन ते तीन महत्त्वाचे विषय मांडलेले आहेत. एक चांगल्या प्रकारचा प्रोटोकॉल संपूर्ण देशभरामध्ये असायला पाहीजे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आयसीएमआरचे डॉ. भार्गव यांच्यासोबत शाळांबाबत निर्णय कशा प्रकारे घ्यावा, याबाबत बोलणं झालं. परंतु पॉझिटिव्हिटी रेट जास्त असेल तर निर्बंध लावण्यात यावा असं त्यांनी सांगितलं. परंतु कोरोनावर उपचार, निर्बंध आणि लॉकडाऊनसाठी देशपातळीवर एकसारखे निकष ठेवा, अशी मागणी केंद्राकडे केल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

मोलनुपिराविर औषधाची उपलब्धता करणं गरजेचं

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मोलनुपिराविरसारख्या औषधाची उपलब्धता रेमिडेसीवीर सारखी होऊ नये, त्यासाठी मोलनुपिराविर औषधाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करून देणं खूप गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच संख्येला अनुसरून आपल्याला खूप मोठी उपलब्धता आणि स्टॉक उपलब्ध असणं आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही याबाबतीत मागणी केली आहे. मात्र, हे स्टॉक लवकरात लवकर कशा पद्धतीने उपलब्ध होईल यामध्ये त्यांनी लक्ष द्यावं, असं टोपे म्हणाले.

- Advertisement -

मोनोक्लोनल अँटीबॉडीज खूप महाग

मोनोक्लोनल अँटीबॉडीज या खूप महाग आहेत. १ लाख २० हजार एका व्यक्तीला जर त्याचा खर्च येत असेल तर तो महाराष्ट्रासारख्या आणि देशासारख्या जनतेला परवडणारा नाही. देशात लोकसंख्येचं प्रमाण खूप मोठं आहे. त्यामुळे आपल्याला हे परवडणारं नाहीये. परंतु आम्ही त्याची किंमत कमी करण्यासाठी मागणी देखील केली आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

जर कोरोनाची तिसरी लाट जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी आली. तर जवळपास ८० लाखांपर्यंत बाधित होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस मनुष्य बळला(HR) केंद्राने फक्त आयसीयूसाठी मान्यता दिलेली आहे. मात्र, एनएचएममध्ये मान्यताच दिलेली नाहीये. तर ती मान्यता दिली पाहीजे. अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही मांडलेली आहे.

- Advertisement -

एनएचएमने सुद्धा पुढे लागणार मनुष्य बळ उपलब्ध व्हावं. यासाठी केवळ आयसीयूसाठी नाही तर सीसीसी आणि डीसीएससीसाठी सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून १० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. उद्या (बुधवार) सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील नव्या निर्बंधाबाबत चर्चा केली जाऊ हे निर्बंध उद्याच सर्व जिल्ह्यांसाठी जाहीर करणार आहे, अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदमध्ये दिली आहे.


हेही वाचा : U-19 World Cup: झिम्बाब्वेच्या चार खेळाडूंना कोरोनाची लागण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -