महाराष्ट्र दिनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट; राज्यातील सर्वांवर होणार मोफत उपचार

Health Minister Rajesh Tope says corona vaccination in Maharashtra will be stopped in 3 days
..तर ३ दिवसांत महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडेल - आरोग्यमंत्री

जगात कोरोनाचे संकट असताना देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य मंत्री जनतेच्या सोयी-सुविधांच्या उपाययोजना करत असतानाच त्यांनी आज राज्यातील जनतेला एक सुखद धक्का दिला आहे. आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर असून महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला दिलेली ही भेट असल्याचे म्हटले जात आहे. जालना येथे महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.


हेही वाचा – Breaking: तळीरामांसाठी गुड न्यूज; वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार


खासगी रुग्णालयांना घातला लगाम 

आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केलेल्या या योजनेनुसार राज्यातील नागरिकांना मोफत आणि कॅशेलस विमा संरक्षण मिळणार आहे. अशी योजना देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचेही यावेळी राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केली जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यालाही लगाम लावत धाडसी निर्णय राज्य शासनाने घेतल्याचेही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी नमूद केले. आतापर्यंत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ८५ टक्के नागरिकांना लाभ दिला जात होता. मात्र यापुढे उर्वरित १५ टक्के लोकसंख्येतील नागरिकांनाही याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पांढरे शिधापत्रिकाधारक यांचाही समावेश या योजनेंतर्गत करण्यात येणार असून राज्यातील सामान्य नागरिकांच्या उपचारावरील आर्थिक खर्चाची काळजी सरकार घेणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

मुंबई, पुण्यातील ज्या मोठ्या रुग्णालयांचे जीप्सा (जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्ट असोसिएशन) सोबत करार झाले आहेत. तसेच विविध आजाराच्या उपचारासाठी विविध पॅकेजेस ठरलेले आहेत. रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना जे दर निश्चित आहेत. त्याप्रमाणेच आकारणी करायची असून रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये का असेन त्यापेक्षा जास्त दर रुग्णालयांना आकारता येणार नाही, अशी सुचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली असून हा निर्णय खासगी रुग्णालयांना बंधनकारक राहणार आहे.

हे मुद्दे आहेत महत्त्वाचे –

  • मुंबई तसेच पुण्यातील ज्या रुग्णालयांचे जीप्सासोबत करार नाहीत
  • मुंबई, पुण्यातील त्या रुग्णालयांसाठी दरसूची निश्चिती
  • दरसूचीपेक्षा अधिकची आकारणी मग रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये असेल ती करता येणार नाही
  • उपचारादरम्यान पीपीई कीटस्, एन ९५ मास्क वापरल्यास खरेदी किमतीच्या १० टक्के वाढीव दर लावण्यास मुभा
  • उर्वरित राज्यातील रुग्णालयांनी जे विविध थर्ड पार्टी अग्रीमेंट (टीपीए) त्यानुसार एकाच उपचारासाठी दर निश्चिती
  • त्यापैकी जनरल वॉर्डच्या किमान दरापेक्षा अधिकचे दर त्यांना आकारता येणार नाहीत