घरताज्या घडामोडीविनाकारण करोनाच्या तपासणीची मागणी करू नये - राजेश टोपे

विनाकारण करोनाच्या तपासणीची मागणी करू नये – राजेश टोपे

Subscribe

करोनाचे ९ रूग्ण पुण्यात आहेत. २ मुंबईमध्ये आणि एक नागपूरमध्ये आहे. यासर्व रूग्णांची तब्बेत ठीक असून त्यांना गंभीर स्वरूपाचा आजार झालेला नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

राज्यामध्ये एकूण १२ करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ९ रूग्ण पुण्यात आहेत. २ मुंबईमध्ये आणि एक नागपूरमध्ये आहे. यासर्व रूग्णांची तब्बेत ठीक असून त्यांना गंभीर स्वरूपाचा आजार झालेला नाही. आजाराच्या वरच्या टप्प्यात कुणीही नसून सर्व स्थिर आहेत. यामध्ये बऱ्याचशा रूग्णांमध्ये अद्यापही करोनाची खूप लक्षणे दिसून येत नाही. परंतु ते पॉझिटिव्ह आहेत, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक लोकांना असे वाटते की, आम्हाला करोनाची तपासणी करायची आहे. कारण आम्हाला करोनाची लागण झाली आहे का, हे तपासायचे आहे, अशी मागणी केली जात आहे. तसेच बऱ्याच नागरिकांना बाहेरील देशातून यायचे असते, त्यावेळी करोना तपासणी अहवाल सोबत आणा, असेही सांगितले जाते. परंतु , अशा मागण्यांमुळे लॅबवर ताण वाढविणे योग्य नाही. त्यामुळे ज्या नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. अशाच नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. करोना तपासणी लॅबची संख्या वाढविणे सोपे नाही. मात्र, जर गरज पडली, तर याबाबत केंद्र सरकारकडे चर्चा केली जाईल, अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत आरोग्यंमत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्य विभागाकडून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम सुरू झालेले आहे. यामध्ये वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर दररोज करोनासंदर्भात जाहिराती दिल्या जात आहेत. तसेच अन्य मार्गाने ही लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. करोना हा आपल्या देशातला आजार नसून तो बाहेरच्या देशातला आहे. यावर मात करायची असेल तर, नागरिकांनी गर्दी आणि त्याचा संसर्ग टाळण्याची गरज आहे. कोणताही शासकीय कार्यक्रम टाळावा. तसेच सर्व टूरवाल्यांनी परदेशातील नागरिकांना घेऊन जाणे टाळावे. करोनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची आज एक बैठक पार पडली. यामध्ये त्यांना काही सुचना दिल्या आहेत. व्हायरल आजारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लोकांमध्ये जनजागृती करणे, त्यांचे प्रबोधन करणे, यावर जास्त भर दिला पाहिजे, असेही राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

बाहेरील नागरिकांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी

नागरिकांच्या मनात बरेच समज-गैरसमज आहेत. कोणालाही काही शंका किंवा प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यादी द्यावी. तसेच आपले नातेवाईक जे बाहेरच्या देशात आहेत, त्याचीही यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावी. १११ देशांमध्ये याचा प्रार्दुभाव झाला आहे. तसेच चार हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. याशिवाय सव्वा लाख लोकांना हा आजार जडला आहे.

नागरिकांसाठी काँरेटाईनच्या सोयी उपलब्ध करणे

केंद्र सरकारकडून आलेल्या सुचनेनुसार, सात देश जे करोनाने अतिबाधित आहेत. तिथून येणाऱ्या पर्यटकांना १०० टक्के काँरेटाईन करणे आवश्यक आहे. खासकरून मुंबई, पुणे व नागपूर या शहरात जास्त विमाने येतात. त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी परदेशातील नागरिकांसाठी काँरेटाईनच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

एन-९५ चा आग्रह नागरिकांनी धरू नये

डॉक्टर आणि स्टाफ यांना एन-९५ मास्क वापरणे गरजेचे आहे. अलीकडे सामान्य नागरिकही या मास्कची मागणी करू लागले आहेत. नागरिकांनी स्वच्छ धुतलेला रूमाल वापरावा, तसेच सॅनिटायझरचा आग्रह असू नये, साबण वापरा. करोना हा चीनमधील वुहान शहरापासून जगभर पसरला. सद्यस्थितीला तिथे करोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांनी शहरात योग्यती खबदारी घेतल्यामुळे तिथून करोनाचे सावट कमी झाले आहे. राज्यातली परिस्थिती लक्षात घेवूनच शाळांसंदर्भात निर्णय घेतला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -