Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Update: राज्यात पुरेशा बेड्सी उपलब्धता - राजेश टोपे

Corona Update: राज्यात पुरेशा बेड्सी उपलब्धता – राजेश टोपे

Related Story

- Advertisement -

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. पण राज्यातील रुग्णालयात बेड्स अपुरे पडत असल्याची बाब समोर येत होती. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, बेड उपलब्ध नाहीत ही स्थिती मुंबई किंवा कुठल्याही जिल्ह्यात नाही आहे. एखाद्या विशिष्ट रुग्णालयात बेड नसण्याची स्थिती असू शकते. त्यामुळे रुग्णांसाठी बेड्स वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुढे राजेश टोपे म्हणाले की, ‘मुंबईत आयसीयूचे ४००, ऑक्सिजनचे २ हजार १६०, व्हेंलिलेटरचे २०० हून अधिक बेड्स उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णांसाठी सर्व जिल्ह्यात बेड्स उपलब्ध आहेत.’

जलील यांनी केलेल्या जल्लोषावर टोपेंची नाराजी

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे राज्य सरकार असणारे निर्बंध आणखी कडक होण्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलणारच आहेत. त्यामुळे नागरिकांनी तशी मानसिकता करावी. कारण हा गर्दी टाळण्यामागचा उद्देश आहे. ज्या ठिकाणी गर्दी जास्त होते, त्या ठिकाणी नियोजन करत आहोत, असे राजेश टोपे म्हणाले. दरम्यान काल औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द केल्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी जल्लोष साजरा केला. याबाबत राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली.

नियम पाळा लॉकडाऊन टाळ

नियम पाळणाऱ्यांना कोरोना होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पण कोरोनाबाधितांची संख्या अशीच राहणार असेल आणि लोकं अशाप्रकारे बेफिकरीने वागणार असतील तर निर्बंधामध्ये अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नियम पाळा लॉकडाऊन टाळा, अशी सूचक विधान राजेश टोपे यांनी यावेळी केले.


- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar health update: शरद पवारांवर होणार दुसरी शस्त्रक्रिया – राजेश टोपे


 

- Advertisement -