घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे दोन हजाराहून अधिक रुग्ण असू शकतात - राजेश टोपे

महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे दोन हजाराहून अधिक रुग्ण असू शकतात – राजेश टोपे

Subscribe

कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे समोर आलं आहे. या आजाराचे रुग्ण आधी इतर राज्यांमध्ये आढळत होते, आता महाराष्ट्रात देखील वाढून लागले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे दोन हजाराहून अधिक रुग्ण असू शकतात, असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. मंगळवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे म्यकर मायकोसिस आजाराचे रुग्ण देखील वाढू शकतात, असं राजेश टोपे म्हणाले. या आजारावर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत हॉस्पिटल मध्ये मोफत करणार पण अनेक हॉस्पिटल त्यासाठी पात्र नाहीत. त्यांच्याकडे डॉक्टर उपलब्ध नाहीत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डोळे, नाक आणि घश्याचे तज्ज्ञ डॉक्टर्सची गरज असते, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांना जोडलेली रुग्णालये म्युकर मायकोसिसचे उपचार केंद्र म्हणून वापरण्याचा निर्णय घेतल्याचं देखील टोपेंनी सांगितलं.

- Advertisement -

म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना लागणारे औषध महाग आहे. रुग्णालयांना हे औषध विनाशुल्क देण्याचा विचार. एमफेटेरेसिल नावाचे औषध आहे. त्याचे १ लाख औषध ऑर्डर हाफकीन दिले आहे. हाफकीन तीन दिवसात टेंडर काढून औषध देणार आहे. हे इंजेक्शन २ हजार रुपयांना मिळत होते ते आता सहा हजारला मिळत आहे. याबाबत केंद्राशी बोललो. NPPA ला बोललो MRP कमी करावा विनंती केली. या आजाराचे रुग्ण वाढले तर समस्या होईल, असं टोपे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -