घरताज्या घडामोडीखुशखबर! 'भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य'

खुशखबर! ‘भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य’

Subscribe

भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य, असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आली, की भारतात कोरोना व्हायरसवरील लस येत्या १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आयसीएमआरचे डायरेक्टर डॉ. भार्गवा यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर टोपे यांनी ही शक्यता वर्तवल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी भारतात कोरोनावर लस तयार झाली असल्याचे समोर आले होते. भारतात कोरोना व्हायरसवर पहिली COVAXIN या नावाची लस आली आहे. मात्र, ही लस कधी लाँच होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच होती. त्यानंतर ही लस १५ ऑगस्ट रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, १५ ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन बाजारात आणणं हे शक्य नाही, असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं होते. मात्र, भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

देशात २४ तासांत कोरोनाचे ५०० बळी!

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यासोबतच आता कोरोना बळींचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. देशात २४ तासांत ५०० रुग्णांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक २८ हजार ७०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ७८ हजार २५४वर पोहोचला असून मृतांचा आकडा २३ हजार १७४ झाला आहे. तसेच सध्या ३ लाख १ हजार ६०९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत ५ लाख ५३ हजार ४७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ६,४९७ नव्या रूग्णांची नोंद; १९३ जणांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -