घरताज्या घडामोडीLockdown: 'लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार, पण..'

Lockdown: ‘लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार, पण..’

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जनतेला कोरोना संदर्भात नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. राजेश टोपे म्हणाले की, ‘आता स्थानिक कलेक्टर आणि कमिशनर यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या उपाय योजनांची आवश्यकता असेल ते त्यांनी करावं, अशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याठिकाणी हे केलं जात आहे. परंतु लॉकडाऊन हा शेवटा पर्याय राहिलं. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष्य ठेवून आहोत.’

किरकोळ स्वरुपात कोरोना रुग्णांची वाढ

पुढे राजेश टोपे म्हणाले की, ‘जसं जशी गरज पडेल त्या पद्धतीनं काळजी घेतली जाईल. पण एक नक्की आहे, फार मोठी संख्या वाढली, अशातला भाग नाही आहे. चार पाचशेने वाढतेय, परत दोन तीनशेचे कमी होतेय. त्यामुळे अडीच तीन हजारपर्यंत वाढण्याचं प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. किरकोळ स्वरुपात कोरोना रुग्णांची वाढ होतेय. चिंता करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे. जिथे जास्त गर्दी असते, तिथे कोरोना संदर्भातील नियम पाळणे गरजेचे आहे.’

- Advertisement -

‘लोकल सुरू झाल्यामुळे मुंबई कोरोनाचे प्रमाण वाढले असे नाही. फार काही मुंबईत वाढ झालेली नाही. तसेच होणार देखील नाही, अशी मुंबईच्या आयुक्तांनी यांनी खात्री दिली आहे. परंतु कोरोनाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे’, असे राजेश टोपे म्हणाले.


हेही वाचा – लॉकडाऊन पाहिजे की निर्बंधांसह मोकळेपणाने रहायचे?, मुख्यमंत्र्यांचा जनतेला सवाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -