घरताज्या घडामोडीआरोग्यमंत्र्यांकडून पॉझिटिव्ह बातमी! राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटबाबत दिले अपडेट

आरोग्यमंत्र्यांकडून पॉझिटिव्ह बातमी! राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटबाबत दिले अपडेट

Subscribe

राज्यातील काही जिल्हे सोडले तर अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहेत. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोनाच्या दिलासादायक परिस्थिती बाबत सांगितले. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कोरोनाची घट होताना दिसत आहे. पण २४ जिल्ह्यांमध्ये अद्यापही कोरोना रुग्ण वाढत आहेत. दरम्यान राज्यातील पॉझिटिव्ह रेट २७ टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आला आहे. टेस्टिंग प्रमाण कुठेही कमी न झाल्यामुळे पॉझिटिव्ह रेटमध्ये ५ टक्क्यांनी घट झाली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

पुढे राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्यात दिवसाला २.५ लाख ते २.८ लाख कोरोनाच्या टेस्ट दिवसाला होत आहेत. यामध्ये ६५ टक्के आरटीपीसीआर तर ३५ टक्के अँटीजन टेस्ट केल्या जात आहे. कोरोनाच्या टेस्टिंगमध्ये कोणतीही घट झाली नाही आहे. गेल्या ३ आठवड्यात ४८ हजार ६२१ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून ५९ हजार ५५० डिस्चार्ज झाले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८४.७ टक्के झाला असून देशाच्या रिकव्हरी रेटपेक्षा महाराष्ट्राच्या रिकव्हरी रेट जास्त आहे. देशाच्या रिकव्हरी रेट हा ८० टक्के इतका आहे.’

- Advertisement -

दरम्यान रेमडेसिवीरचा पुरवठा अधिक प्रमाणात व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. ९ मे पर्यंत रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. पण रेमडेसिवीरची मागणी केल्याप्रमाणे अजूनही पाहिजे तेवढे रेमडेसिवीर मिळत नाही आहेत, अशी खंत यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

महत्त्वाचे मुद्दे असे – 
• राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते.
• आज राज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे.
• दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
• स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील.
• तरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये.पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
• राज्य शासनाने रेमडेसीवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसीवीर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल.
• राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्य ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
• केंद्र शासनाकडून राज्याला जे १० पीएसए प्लांट मंजीर आहेत त्यातील ९ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.
• सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज ४० हजाराच्या आसपास रेमडीसीवीर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसीवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत.
• राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात १६ जिल्ह्यांत ऑक्सिजन तुटवडा, मुख्य सचिव सीताराम कुंटेंचे केंद्राला पत्र


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -