घरताज्या घडामोडीराज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसची चिंता! १३ पानांची गाईडलाईन जारी करणार - राजेश टोपे

राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसची चिंता! १३ पानांची गाईडलाईन जारी करणार – राजेश टोपे

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लाईव्ह येऊन चर्चेत झालेल्या मुद्द्यांबाबत सांगितले. राज्यात एका बाजूला कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी दुसऱ्या बाजूला म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी आवश्यक असलेले इंजेक्शन अॅम्फोटेरेसिनी बी (Amphotericin B) राज्याला उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच टास्क फोर्सच्या माध्यमातून म्युकरमायकोसिस संदर्भात झालेल्या १३ पानांची गाईडलाईन जारी करत आहोत, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे म्हणाले की, ‘पंतप्रधान यांच्या झालेल्या व्हिसीमध्ये राज्यातील १७ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी मिळाले. तसेच पोपटराव पवार राज्याच्या वतीने बोलले. हिरवरे बाजार कसे कोरोनामुक्त झाले, याबाबत माहिती दिली. सध्या कोरोना चाचणी वाढणे महत्त्वाचा विषय असून यामुळे पॉझिटिव्हीटी रेट कमी करू शकतो. तसेच ऑक्सिजन संदर्भात चांगल्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्या. त्यामुळे ही व्हिसी माहितीपूर्वक झाली.’

- Advertisement -

‘पण राज्यात म्युकरमायसोसिसची चिंता वाढत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने म्युकरमायकोसिसवर उपचार करणारे इंजेक्शन द्यावे. संबंधित कंपनीला राज्याकडून २ लाख इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. पण जोपर्यंत केंद्राकडून वाटप होत नाही तोपर्यंत राज्याला इंजेक्शन दिले जाऊ शकत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान कंपनीच्या उत्पादनाला काही अडचणी येते आहेत. कारण त्यांना कच्चा माल किंवा त्याचे एक लिक्विट असले, जे जर्मनीतून मिळते ते मिळण्यास अडचणी येत आहेत. पण या सगळ्या अडचणीवर केंद्र शासनाने मात करावी आणि राज्याला कोणत्याही परिस्थिती अॅम्फोटेरेसिनी बी उपलब्ध करू द्यावे. कारण महाराष्ट्रामध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण सुद्धा मोठ्या पद्धतीने आहे. दरम्यान याबाबत टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन म्युकरमायकोसिस संदर्भात नव्या गाईडलाईन तयार करण्यास सांगितले होते. त्या गाईडलाईन १३ पानांच्या झाल्या असून लवकरच जारी करत आहोत. त्यामध्ये म्युकरमायकोसिस संदर्भातील उपचार करण्याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच यानंतर प्रत्येक जिल्हामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम ठेवले जाईल,’ अशी सविस्तर माहिती राजेश टोपे यांनी दिली.


हेही वाचा –  Coronavirus: राज्यातील १७ जिल्हाधिकाऱ्यांशी मोदींचा संवाद; म्हणाले, गाव-खेड्यांत अधिक लक्ष देण्याची गरज

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -