घरताज्या घडामोडीरुग्णवाढीप्रमाणे बेड्सही वाढलेच पाहिजे, आरोग्यमंत्र्यांचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

रुग्णवाढीप्रमाणे बेड्सही वाढलेच पाहिजे, आरोग्यमंत्र्यांचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागावर जास्त भर पडला असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी बेड्सपासून ते औषधांपर्यंतच्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहे. याच अनुषंगाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आज राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश आणि सूचना दिल्या. यावेळी त्यांनी रुग्णवाढीप्रमाणे बेड्स वाढलेच पाहिजे. बेड्स नाही असं उत्तर कदापि सहन करणार नाही, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

पुढे आरोग्यमंत्री म्हणाले की, रुग्णालयात जर जागा नसेल तर इंस्टिट्यूशनल ठिकाण वाढवा. जे कोणतेही रुग्णालय असेल तिथले ८० टक्के बेड्स ताब्यात घेतले पाहिजे, अशा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार झाले पाहिजे. रुग्णांकडून कोणत्याही प्रकारे वाढीव बील आकारू नये. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या टक्केवारीत वाढ झाली पाहिजे, अशी सूचना सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर देण्यात आली आहे.

- Advertisement -

गृहविलगीकरणात घरातील इतरांना त्रास होता कामा नये. लक्षणे आढळल्याने त्वरित चाचणी करणे गरजेच आहे. तसेच २४ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचण्याचे रिपोर्ट आलेच पाहिजे. तसेच गरज भासत असेल तर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा वापर करा. इंस्टिट्यूशनल आयसोलेशन झाले तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल, असे राजेश टोपे म्हणाले.


हेही वाचा – राज्याला पुरेसे remdesivir इंजेक्शन ४ दिवसात मिळणार – राजेश टोपे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -