आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या जावयाला अटक, ‘या’ गुन्ह्याखाली कारवाई

Tanaji Sawant
तानाजी सावंत

सोलापूर – राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांच्या जावयाला मोहोळ पोलिसांनी अटक केली आहे. दलित व्यापाराला शिविगाळ केल्याप्रकरणी शिवजयंतीनिमित्त वाद झाला होता. हा वाद मोहोळ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल झाला होता. अखेर त्यांना आज अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – तुम्ही केलेल्या संघर्षाला यश.., एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पवारांनी दिल्या शुभेच्छा

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांच्या मुलीचे पती जयसिंह चक्रपाणी गुंड हे मोहोळ येथील अनगर येथे वास्तव्यास असून तेथील ते ग्रामविकास अधिकारी आहेत. तसंच, जयसिंह चक्रपाणी गुंड यांचा मुलगा प्रथमेश गुंड याचा या परिसरात छोटा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी या व्यवसायातून जयसिंह चक्रपाणी गुंड, प्रथमेश जयसिंह गुंड, जयवंत महादेव थिटे, अक्षय राजेंद्र कारमकर या चौघांनी गावातील एक दलित व्यापाऱ्यास शिवीगाळ केली होती. नंतर शिवजयंतीदिनी काही कारणांनी हा वाद उफाळून आला. हा वाद मोहोळ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सोलापुरातील माढा तालुक्यात सावंत कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. तानाजी सावंत यांचे पाच भावांचे कुटुंबीय वाकाव गावात राहतात. त्यांचा मोठा भाऊ कालिदास सावंत यांच्या मुलीचा विवाह अनगर येथील जयसिंह चक्रपाणी गुंड यांच्यासोबत झाला आहे.