घरताज्या घडामोडीमहामारीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधन होणे आवश्यक : राज्यपाल भगत...

महामारीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधन होणे आवश्यक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Subscribe

कोरोना सारख्या काळात आरोग्य व्यवस्थेचे महत्व अधोरेखित झालेे. या काळात आर्युवेद, होमिओपॅथी सारख्या पॅथींनीही एकत्रित येत काम केले हे खरोखर वाखाणण्याजोगे आहे. परंतु आता अशा महामारीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधनाला चालना मिळावी असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकिय इमारतीचे नुतनीकरण तसेच सौरउर्जा प्रकल्पाच्या उदघाटन सोहळयानिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलतांना राज्यपाल म्हणाले, डॉक्टरांचे काम हे तसे अवघड आहे. नर्स बनने आणि सुश्रृषा करणेही अवघड आहे. शिक्षक आणि डॉक्टर हा पेशा असा आहे जे आयुष्यभर लोकांसाठी काम करतात. शिक्षण तर महत्वपूर्ण आहेच. पण वैद्यकिय शिक्षणाचे सर्वाधिक महत्व आहे. याकरीता लिडरची भुमिका फार महत्वाची असते. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेउन देशाच्या प्रगतीला हातभार लावाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना सारख्या महामारीने आरोग्य व्यवस्थेचे महत्व अधोरेखित केल्याचे ते म्हणाले. परंतु या महामारीने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, आपण संशोधनही केले पाहीजे. भारतीय पुरातन पॅथी, इम्युनिटी वाढविण्यासाठी गुणकारक आहे. याचं संशोधन आणी जनजागृती करावी. कोरोना काळात सर्व पॅथींनी एकत्रित येउन काम केले. विशेष करून आर्युवेदात इम्युनिटी वाढविण्याच्या दृष्टीने चांगली औषधे आहेत. होमिओपॅथीच्या औषधांनीही लोकांना फरक पडला. त्यादृष्टीने आपण अभ्यास केला पाहीजे असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोना के भय से मत डरो, डटके सामना करो, असा सल्लाही राज्यपालांनी नागरिकांना दिला. आरोग्य विद्यापीठाच्या सौरउर्जा प्रकल्पाचे कौतुक करतांना ते म्हणाले, सोलर ऊर्जेला मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना, प्रोत्साहन दिलं. नरेंद्र मोदी यांनी सोलर ऊर्जानिर्मितीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिल्याचंही राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी अधोरेखित केले आहे. खरा लीडर हा आपत्कालीन परिस्थितीत लक्षात येतो. मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आणि आग्रही भूमिका घेतली, ती खरंच कौतुकास्पद असल्याचंही राज्यपालांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -