जेल की बेल? नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी ११ वाजता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

NCP leader Nawab Malik’s son Faraz booked in cheating case over use of fake documents in visa plea

मुंबई –  मनी लॉड्रिंगप्रकरणात (Money Laundering Case) तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थामुळे कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे, त्यांच्या आजाराचे कारण देत त्यांना जामीन मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, मागच्या सुनावणीत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

हेही वाचा टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्हीसी विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

मनी लॉड्रिंगप्रकरणी (Money Laundering Case) इडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. मलिक यांचे दाऊदच्या संबंधित व्यक्तींबरोबर आर्थिक गैरव्यवहार असल्याचा इडीचा आरोप होता. त्यानंतर दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला इडीने ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले. यात दाऊदच्या माणसाशी संबंधित असलेल्या कंपनीबरोबर मलिक यांचा संबंध असल्याचे तपासात आढळले. त्यानंतर इडीने मलिक यांना अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी ११ वाजता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

हेही वाचा – तुकाराम मुंढेंची दोन महिन्यांत आरोग्य खात्यातून उचलबांगडी, नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत

काय आहे प्रकरण?

कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड येथील जमीनीच्या व्यवहारात दाऊद कनेक्शन असल्याचे आरोप राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट आरोपीकडून ही जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यानंतरच ईडीची टीम सक्रीय झाली होती. ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली. या संपूर्ण प्रकरणात गाजलेली गोवावाला कंपाऊंड ही जमीनही या कारवाईत ईडीने जप्त केली आहे. या जमीनीच्या व्यवहारातील पैसे हे दहशतवादी कारवायांसाठी पाठवण्यात आल्याचे आरोप फडणवीस यांनी केले होते. तसेच दाऊद इब्राहिमच्या बहिणीने या व्यवहारातील पैसे हे दहशतवादी कारवायासाठी पोहचवल्याचा आरोपही त्यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी पंजाब येथे झालेल्या एका कारवाईत दहशतवादासाठी पैसे पुरवण्याच्या एका प्रकरणात नवाब मलिक कनेक्शन आढळले होते. त्यानंतर नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) ने या प्रकरणात चौकशीला सुरूवात केली होती.