Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर आजपासून सुनावणी सुरू; 'अशी' आहे ठाकरे गटाची रणनीती, जाणून...

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर आजपासून सुनावणी सुरू; ‘अशी’ आहे ठाकरे गटाची रणनीती, जाणून घ्या सविस्तर

Subscribe

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आजपासून, गुरुवारी सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी केली जाणार आहे. आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाची रणनिती ठरवण्यात आली आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आजपासून, गुरुवारी सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि
ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी केली जाणार आहे. आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाची रणनिती ठरवण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांकडून अध्यक्षांकडे वकीलपत्र सादर करण्यात आलं असून त्यांच्यामार्फत अध्यक्षांकडे दोन पानी लेखी म्हणणं सादर करण्यात आलं आहे. (Hearing on disqualification of Shiv Sena MLA starts today This is the strategy of the Thackeray group know in detail Rahul Narvekar )

14 सप्टेंबरपासून सर्व शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीला बुधवारी बारा वाजता सुरुवात होईल. राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. एकचा दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सदर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावण्यात येणार आहे.

ठाकरे गटाची रणनीती काय?

- Advertisement -

ठाकरे गटाच्या सर्व आमदारांकडून अध्यक्षांकडे वकीलपत्र सादर करण्यात आलं असून त्यामार्फत विधानसभा अध्यक्षांकडे वकीलपत्र सादर करण्यात आलं असून त्यामार्फत विधानसभा अध्यक्षांकडे दोन पानी लेखी म्हणणं सादर करण्यात आलं आहे. सर्व आमदारांच्या उत्तरात एकमत राहावं यासाठी वकिलांमार्फत उत्तर पाठवण्यात आलं आहे. तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांकडून वकिलपत्रातून लेखी म्हणणं सादर करण्यात आलां आहे. प्रत्यक्ष सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील देवदत्त कामत आणि असीम सरोदे हे सर्व आमदारांची बाजू मांडणार आहेत. यापूर्वी विधानभवनात आज ठाकरे गटाची बैठक असून सुनावणी आधी सर्व ठाकरे गटातील आमदार एकत्रित चर्चा करणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -