घरमहाराष्ट्रइंदोरीकर महाराजांवरील सुनावणी २ डिसेंबरला

इंदोरीकर महाराजांवरील सुनावणी २ डिसेंबरला

Subscribe

सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुट्टीवर असल्याने इंदोरीकर महाराजांविरोधातील सुनावणी २ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी नवे सरकारी वकील अरविंद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केलेल्या इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला सध्या सरकारी वकीलांमुळे गाजत आहे. सरकारी वकीलांच्या भावाचा खटला इंदोरीकर यांचे वकीलांकडेच असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी या प्रकरणातून माघार घेतली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुट्टीवर असल्याने इंदोरीकर महाराजांविरोधातील सुनावणी २ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी नवे सरकारी वकील अरविंद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इंदुरीकर महाराजांचे वकील अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांच्याकडे सरकारी वकील अँड. बी. जी. कोल्हे यांच्या भावाचे न्यायप्रविष्ठ प्रकरण आहे. या संबंधाचा इंदोरीकरांच्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो असा आरोप झाल्याने कोल्हे यांनी खटल्यातून माघार घेतली. सुनावणीच्या दोन दिवस अगोदर कोल्हे यांनी माघार घेतल्याने २५ नोव्हेंबरची सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र जिल्हा सरकारी वकील व आरोग्य विभागाकडून तातडीने या नवे सरकारी वकील अरविंन राठोड यांनी नियुक्ती केली. मात्र सत्र न्यायालयाच्ये न्यायाधीश रजेवर असल्याने ही सुनावणी २ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अँड. रंजना गवांदे बाजू मांडत आहेत. न्यायालयाने सर्व वकीलांना लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -