घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर २७ सप्टेंबरला होणार सुनावणी, घटनापीठ काय निर्णय घेणार?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर २७ सप्टेंबरला होणार सुनावणी, घटनापीठ काय निर्णय घेणार?

Subscribe

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आता पुढची सुनावणी मंगळवारी, २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेने बंड करून भाजपासोबत नवं सरकार स्थापन केलं आहे. या सरकारच्या वैधतेलाच शिवसेनेकडून आव्हान देण्यात आलं आहे. याप्रकरणी ७ सप्टेंबर रोजी शेवटची सुनावणी झाली होती. अवघ्या १० मिनिटांच्या या सुनावणीत शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले होते. त्यानंतर, याबाबत २७ सप्टेंबर रोजी तपशीलवार सुनावणी घेण्याचे आश्वासन न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेत.

- Advertisement -

हेही वाचा – हाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लाइव्ह पाहता येणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

घटनापीठासमोरील प्रकरणांचं लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याचा ठराव सरन्यायाधीश उदय लळीत यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे २७  सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी लाईव्ह पाहता येणार आहे. युट्यूबवर याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी उठाव करत, ठाकरे सरकार खाली खेचले. त्यानंतर शिवसेनेच्या या 40 आमदारांसह अन्य 10 आमदारांना बरोबर घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेनेतील दोन गटांचा वाद शिगेला पोहोचला आहे. एकीकडे आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे, खरी शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -