मुंबई : आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी होणरा आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुपारी तीन वाजता ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विधानसभा अध्यक्ष आज सुनावणी घेणार आहे. या सुनावणीदरम्यान पुढची दिशा निश्चित केली जाईल. आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक आज समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी 14 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. यानंतर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे एकमेकांना देण्यास सांगितले होते. शिवाय, दहा दिवसांमध्ये याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शिंदे गटातील आमदारांना उत्तर देण्यासाठी वेळ देखील दिला होता. यानंतर आज सुनावणीची दुसरी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले
मागील आठवड्या भरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. एका आठवड्याच्या आत सुनावणी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिले. यानुसार विधासभा अध्यक्षांनी आज सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज होणाऱ्या सुनावणीसाठी सर्व आमदारांना उपस्थित राहणार नाही. या आमदारांची बाजू ही त्या गटाच्या वकिलांकडून आज सुनावणीदरम्यान मांडण्यात येणार आहे. यात गेल्या चार महिन्यापासून अध्यक्षांनी आमदार अपत्रतेप्रकरणात काय केले, याबाबत माहिती देण्यात येईल.
हेही वाचा – पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत नाराजी; फेरवाटपाची मागणी
आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी निर्णय दिला होता. या निर्णयाला चार महिने उलटून गेले आहेत. पण चार महिन्या आमदार अपात्रतेची कारवाई फारशी पुढे सरकलेली नाही, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणी पुढची रुपरेषा स्पष्ट होते का?याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.