घरताज्या घडामोडीदिर्घकालीन आजार असलेल्यांना 'करोना'चा धोका; अशी घ्या विशेष काळजी

दिर्घकालीन आजार असलेल्यांना ‘करोना’चा धोका; अशी घ्या विशेष काळजी

Subscribe

दिर्घकालीन आजार असलेल्यांना 'करोना'चा धोका सर्वाधिक आहे, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

करोना व्हायरस या आजाराची लागण होऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही केले जात आहे. विशेषतः रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांवर हा विषाणू आघात करत असल्याने हृदयविकार आणि मधुमेह असणाऱ्या या रुग्णांना याचा धोका सर्वाधिक आहे, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या करोना व्हायरस या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या आजाराने आता महाराष्ट्रासह मुंबईतही पाय रोवू लागल्याने लोकांमध्ये भितीचे सावट पसरू लागले आहेत. दरम्यान, करोनामुळे जगभरात १ लाख ६८ लोक बाधित झाले आहेत. यातील ६ हजार ५०० लोकांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. भारतात ११२ जणांना करोनाची लागण झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही वृद्ध होते. दिल्लीतही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आता महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

मधुमेह-हदयरोग असलेल्यांना अधिक धोका

राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत ४२ जणांना करोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, करोना हा आजार संसर्गजन्य असल्याने कोणत्याही वयातील व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामुळे सध्या मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जगभरात पसरलेल्या करोना विषाणुमुळे एक मोठे संकट देशभरात उभे राहिले आहे. करोना विषाणुच्या संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहता त्यादृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे, मधुमेही-हदयरोगींनी मात्र, अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण, अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती ही सर्वसामान्यांच्या तुलनेने कमी असते आणि त्यामुळे त्यांना जर अशा प्रकारच्या विषाणुची लागण झाल्यास त्यामुळे गुंतागुत वाढू शकते आणि आजाराची गंभीरता वाढू शकते.

- Advertisement -

गरोदर महिला, लहान मुले, वरिष्ठ नागरिक तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार असणाऱ्या व्यक्तींनी या काळात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, अशा व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सर्वसाधारणपणे इतरांच्या तुलनेत कमी असते. अशा व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. – डॉ. निमित शहा; सर.एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे, इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट

चीनमध्ये मधुमेही रुग्णांमध्ये अन्य नागरिकांच्या तुलनेत सर्वाधिक करोना व्हायरसची प्राथमिक लक्षणं आढळून आली असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. त्यामुळे सध्या मधुमेही रुग्णांनी प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तोंडाला मास्क लावावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शारीरिक स्वच्छता राखणे गरजेचं आहे. तसेच श्वास घ्यायचा त्रास जाणवत असेल किंवा सर्दी आणि खोकला अधिक काळ असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. – डॉ. सुहास खैरे; झेन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील एंडोक्रिनोलॉजिस्ट सल्लागार आणि मधुमेही तज्ज्ञ

- Advertisement -

काय आहेत आजाराची लक्षणे?

  • ताप येणे
  • घशाला कोरड
  • अंग दुखणे
  • सर्दी होणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे

    काय काळजी घ्याल ?

    संतुलित आहार घेणे, शक्यतो गर्दीची ठिकाणी जाणे टाळावे. संसर्गापासून बचाव करण्यासाठी तसेच सर्दी-खोकला असल्यास रुमालाचा वापर करून स्वतःच संरक्षण करावे. शारीरीक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत वेळोवळी हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, खोकताना अथवा शिंकताना नाकावर तसेच तोंडावर रुमाल ठेवावा. आजारी व्यक्तींच्या संपर्कात राहणे टाळा.


    हेही वाचा – ‘करोना’ हेअर स्टाईलचा नवा ट्रेंड


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -