घरमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस...राज्यातील या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा

Maharashtra Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस…राज्यातील या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा

Subscribe

मुंबई : होळी संपल्यानंतर उन्हाळा सुरू होतो, असं म्हटलं जातं. पण अलीकडे त्याही आधीपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होते. सध्या तर राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. एकीकडे उन्हाचे चटके बसत असतानाच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने अहमदनगर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra News : उष्माघातामुळे 33 जण रुग्णालयात; आरोग्य विभागाचा सावधानतेचा इशारा

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वेळोवेळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारनंतर संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. अहमदनगर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कमाल तसेच किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. परंतु उद्यापासून आकाश निरभ्र असल्यामुळे किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पुण्यात असे असेल हवामान

पुणे तसेच आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. 4 एप्रिल नंतर वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्यात रविवारी कमाल तापमान 38.4 तर किमान तापमान 22.4 नोंदवले गेले. पुणे जिल्ह्यात शिरूरमध्ये सर्वाधिक 42 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

हेही वाचा – Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी; आरोग्य यंत्रणा सतर्क 

सोलापूर जिल्हा सर्वाधिक हॉट

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात रविवारी ४१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यात थोडी घट झाली असली तरी, उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -