घरताज्या घडामोडीकोकणासह गोव्यात 'या' दिवशी येणार उष्णतेची लाट, हवामान खात्याने दिली माहिती

कोकणासह गोव्यात ‘या’ दिवशी येणार उष्णतेची लाट, हवामान खात्याने दिली माहिती

Subscribe

२४ आणि २५ मार्चला कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे तर आता राज्यात उष्णतेचं प्रमाणही वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोकण जिल्ह्यात येत्या काळात उष्णतेमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. २४ आणि २५ मार्चला कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. आज आणि उद्या कोकणासह गोव्यातही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उष्णता वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४५ दिवसात कोकण आणि गोवा वगळता देशातील इतर कोणत्याही भागात उष्णता वाढणार नाही. कोकण आणि गोव्यातील वातावरण हे ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत  मार्च महिन्यात तीन वेळा ३८ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली४ मार्चला ३८.१ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्याक आले.  तर १३ मार्चला ३८.२ डिग्री सेल्सिअस आणि २४ मार्चला ३८.१ डिग्री सेल्सिअर तापामानाची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – सिंधुदुर्ग ZP अध्यक्षपदी संजना सावंत यांची वर्णी
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -