घरमहाराष्ट्रपुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

Subscribe

पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुणे वेधशाळेकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

राज्यात सध्या काही भागांत अवकाळी पाऊस तर काही भागांत उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या तब्येती खराब होत आहेत. पण आता हवामान खात्याकडून राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण येतील पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुणे वेधशाळेकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याने सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वाधिक तापमान असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. राज्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून हवामान खात्याने देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाट येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका आणि भरपूर पाणी पित रहा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, उद्या (2 जून) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यासोबत मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 4 जूनला कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारादेखील पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. 5 जूनला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पाऊस येण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे दरवर्षी केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होणारा मान्सून यंदा मात्र उशीरा पोहचणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी 8 दिवस उशिराने मान्सूस येणार असल्यामुळे जूनच्या 14 ते 15 तारखेपर्यंत राज्यात दस्तक देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 96 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे जूनमधे सरासरीच्या 25 टक्के कमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविली आहे. दक्षिण-मध्य कोकणात सामान्य पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी जून महिन्यात तापमान एक-दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सुरुवातीचे काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

- Advertisement -

दुसऱ्या आठवड्यात वाढेल मान्सूनची वेग

मान्सून उशीरा येत असल्यामुळे जुनच्या पहिल्या आठवड्यात गती कमी असेल, मात्र दुसऱ्या आठवड्यात वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार मान्सून कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ईशान्येतील सात राज्यांत दिसून येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -