घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र, गुजरातमध्ये heat wave चा कहर, पालघर, पोरबंदरमध्ये पाऱ्याने गाठली चाळीशी

महाराष्ट्र, गुजरातमध्ये heat wave चा कहर, पालघर, पोरबंदरमध्ये पाऱ्याने गाठली चाळीशी

Subscribe

मुंबईसह कोकण परिसरात गुरूवारी तापमानाचा पारा चढल्याचीच आकडेवारी विविध ठिकाणाहून समोर आली आहे. पण त्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे पालघरचा. पालघरमध्ये तापमानाचा गुरूवारी दुपारी पारा सर्वाधिक असा ४१ डिग्री सेल्सिअसवर दुपारच्या वेळेत पोहचला होता. तर आर्द्रतेचे प्रमाण हे २० टक्के इतके होते अतिशय उकाड्याचे आणि कोरड अस वातावरण मुंबईसह कोकण परिसरात अनुभवायला मिळाले. येत्या दोन दिवसात असाच उकाडा अनुभवायला मिळेल असे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतही गुरूवारी तापमानाचा पारा ३९ डिग्री सेल्सिअस होता, तर आर्द्रतेचे प्रमाण हे २० टक्के इतके होते. प्रादेशिक हवामान विभागाने याआधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार एनसीयूएम NCMRWF हवामान मॉडेल मार्गदर्शनानुसार, कोंकण भागावर ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वारा यामुळे मुंबईसह पुढील दोन दिवसांत कोकणात तापमानात वाढ होऊ शकते. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत या उष्णतेच्या लाटेचा (heat wave) परिणाम राहणार आहे. महाराष्ट्रात कोकण परिसरासह गुजरातमध्येही हिट वेव्ह म्हणजे उष्ण लाटेची परिस्थिती पहायला मिळत आहे. गुजरातमध्येही सरासरीपेक्षा ६ डिग्री सेल्सिअस ते ८ डिग्री सेल्सिअस इतके अधिक तापमान वाढल्याचे पहायला मिळाले आहे. गुजरातच्या पोरबंदरमध्ये ४०.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद ही गुरूवारी झाली.

- Advertisement -

मुंबईत कुठे चढला तापमानाचा पारा

मुंबईत सर्वाधिक अशा तापमानाची नोंद ही सांताक्रुझ आणि चेंबूरमध्ये झाल्याचे पहायला मिळाले. चेंबूरमध्ये दुपारच्या वेळेत ३८.७१ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रुझ येथे ३९ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. बोरिवलीतही तापमानाचा पारा हा ३८ डिग्री सेल्सिअसवर पोहचला होता.

- Advertisement -

राज्यात कुठे किती तापमानाची नोंद

राज्यात कोकण परिसरात उत्तर कोकणात पालघरमध्ये ४१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दक्षिण कोकणात रत्नागिरी येथे ३८ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. याठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण हे ४० टक्के इतके होते. येत्या दिवसांमध्येही कोकणात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणही पहायला मिळाले आहे.

तापमानाचा पारा चढताच (डिग्री सेल्सिअस)

सांगली ३७.७
डहाणू ४१
पुणे ३७.१
सांगली ३७.७
जळगाव ३८.२
नाशिक ३६.४
रत्नागिरी ३७.३
सातारा ३६.१
मालेगाव ३६.८
अलिबाग ३८.८
नांदेड ३८.५
जालना ३६
मुंबई ३८.७


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -