घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरHeatstroke : मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी; आरोग्य यंत्रणा सतर्क 

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी; आरोग्य यंत्रणा सतर्क 

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उकाड्यातही वाढ होताना दिसत आहे. वाढत्या तापमानाचा फटका विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 39 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये राहणाऱ्या गणेश राधेश्याम कुलकर्णी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Heatstroke First victim of heatstroke in Marathwada Health system on alert)

हेही वाचा – Modi VS Raut : मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तक्रार करणार; पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांची टीका

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुलकर्णी (30) हा तरुण पैठण तालुक्यातील बिडकीन याठिकाणी एका खासगी कंपनीत कामाला होता. तो जैनपूर मार्गाने बिडकीनकडे जात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला. यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला. त्यामुळे त्याला तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मात्रे यांनी गणेशला तपासून मृत घोषित केले. तसेच गणेशचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली.

राज्यात उष्णतेची लाट

राज्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात मंगळवारपासून (एप्रिल) काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील तापमान वाढणार आहे. त्यामुळे विदर्भातील कमाल तापमान 42 अंश सेल्सियस पार पोहचण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Shirur Lok Sabha Constituency : अढळरावांच्या प्रचारात वळसेंची साथ नाही; दुखापतग्रस्त हाताचं कारण 

उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क 

राज्यात उष्णतच्या लाटेमुळे होणारी जिवितहानी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने यंदा फेब्रुवारी महिन्यात याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. तसेच लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रमही हाती घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. ज्या भागात उष्णता विकारांचे प्रमाण वाढलेले आढळेल त्याठिकाणी तत्काळ आरोग्य यंत्रणेला तसेच महापालिकांशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे डेथ ऑडिट जिल्हास्तरिय डेथ ऑडिट समितीकडून एका आठवड्यात करण्याचे आदेशही आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -