घरदेश-विदेशराज्यात वाढणार उन्हाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा

राज्यात वाढणार उन्हाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा

Subscribe

मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानापासून मुंबईकरांची सुटका आजही होणार नाही. आगामी काही दिवसांमध्ये मुंबई शहरातील तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

मान्सूनचं आगमन अवघ्या काही दिवसांवर असतानाच आता राज्यातील हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानापासून मुंबईकरांची सुटका आजही होणार नाही. आगामी काही दिवसांमध्ये मुंबई शहरातील तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ( Heatwave will increase in the state Meteorological Department warning )

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मोठ्या फरकाने तापमान वाढ झाल्याचं पाहायला मिळाले आहे. राज्याच्या किनारपट्टी भागातही उष्णतेचा दाह अधिक जाणून लागला आहे. येणाऱ्या काही दिवसांत हा दाह आणखी प्रभावी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

तसचं, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असल्या तरीही सध्याचं हवामान पावसासाठी पूरक असल्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तत्सम परिस्थिती उद्भवू शकते.

असं आहे देशातील हवामान

देश पातळीवर हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर हिमालयाच्या पश्चिमेला आणखी एक पश्चिमी झंझावात सक्रीय आहे. ज्यामुळे दिल्लीसह देशातील बहुतांश मैदानी क्षेत्रांमध्ये पावासाची हजेरी पाहायला मिळू शकते. शिवाय 24 ते 27 मे या कालावधीत देशातील उत्तरेकडील राज्य, सिक्कीम, झारखंड या भागांमध्ये जोरदार पर्जन्यमानाचा अंदाज आहे.

- Advertisement -

तसचं, आज उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये धुळाचं वादळ येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, बिहारचा उत्तर बाग, ओडिशा, पश्चिम बंगाल या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील.

( हेही वाचा: महाविकास आघाडी कायम राहणार अजित पवार यांचा ठाम विश्वास )

हवामान खात्याने काही दिवसांत भारताच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने 23 ते 25 मे दरम्यान पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -