घरताज्या घडामोडीपेण-खोपोली मार्गावर कार व ट्रकची जोरदार धडक; 3 ठार, ४ जखमी

पेण-खोपोली मार्गावर कार व ट्रकची जोरदार धडक; 3 ठार, ४ जखमी

Subscribe

पेण-खोपोली मार्गावरील वाक्रुळ येथे इकोकार व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून, चार जण जखमी झाल्याची माहिती मिळते. रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

खोपोली : पेण-खोपोली मार्गावरील वाक्रुळ येथे इकोकार व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून, चार जण जखमी झाल्याची माहिती मिळते. रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर वाक्रुळ येथील परिसरातील वाहतुककोंडी झाली होती. (Heavy collision between eco car and truck on Pen Khopoli road 3 killed 4 injured)

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात विक्रम गोविंदराव दिंडे ( 50), नागेश विक्रम दिंडे (27) आणि प्राजक्ता नागेश दिंडे वय 25 हे जागीच ठार झाले. तसेच, गजानन चंदन वडगावकर (13), विकी विठ्ठल श्रीरामे (15), मीनाक्षी विक्रम दिंडे (22), कविता विक्रम दिंडे (45) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे सातही जण इकोकारमधून प्रवास करत असून, ते बाळुमामाच्या यात्रेसाठी जात होते.

- Advertisement -

नेमका कसा झाला अपघात?

इकोकारमधून (एमएच-46-ए-1003) सात जण बाळूमामाच्या जत्रेसाठी कोल्हापूरच्या दिशेने जात होते. तसेच, ट्रक (एमएच-43-बीजी-3234 ) हा खोपोलीहून पेणच्या दिशेने येत होता. त्यावेळी पेण पूर्व विभागातील वाक्रुळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

- Advertisement -

पेण-खोपोली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

या अपघातामुळे पेण-खोपोली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक आपटा-रसायनी-पनवेल मार्गे वळविण्यात आली होती.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी, युवकांनी तातडीने धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांनी मदतकार्य सुरु केले. विशेष म्हणजे त्यावेळी अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरलेले कल्पेश ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत जखमींना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून पेणच्या सरकारी रुग्णालय, म्हात्रे रुग्णालय आणि त्यानंतर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात तातडीने दाखल केले. सध्या या अपघाताची पेण पोलीसांनी दखल घेतली असून, ते अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

या अपघातातील दिंडे परिवार हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत.


हेही वाचा – मोगॅम्बो खुश हुआ! अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -